Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ओबीसी मंत्र्यांनो आता तरी लाचारी सोडा : खासदार सुनील मेंढे
- भंडारा – गोंदिया तील शेतकरी शासकीय धान खरेदी पासून वंचित राहणार नाही. खा. सुनील मेंढे
- Bhandara Crime:बहिनिवर चाकूने वार करुन भावाचे विषप्राशन
- Bhandara accident:भीषण अपघातात एकाचा मृत्यू; एक गंभीर
- Bhandara:मंडळ अधिकाऱ्यावर हातोडा उगारून टिप्पर पळविला
- Bhandara:जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी नाट्य बंद करावे – मोहन पंचभाई
- नागपूर येथील अपघाताने भंडाऱ्यावर शोककळा;
- संतापजनक! भाजी आवडली नाही म्हणून दीराने वहिनीसोबत केलं भयंकर कृत्य
Author: crime24tass
आरक्षणावरून भाजप आक्रमक : रस्त्यावर उतरून आंदोलन करणार भंडारा : महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे ओबीसी राजकीय आरक्षण राज्यात गमावले व ते पुन्हा मिळत नाही. सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी आता तरी लाचारी सोडावी आणि ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान खासदार सुनील मेंढे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिले.खा. मेंढे म्हणाले की, ओबीसींना राजकीय आरक्षण देताना ते किती प्रमाणात द्यावे हा प्रश्न आहे व त्यासाठी समर्पित आयोगामार्फत एंपिरिकल डेटा अर्थात ओबीसींची वस्तुस्थिती नुसार आकडेवारी गोळा करून प्रमाण ठरवणे आणि एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्या मर्यादेत ठेवणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च २०२१ रोजी महाराष्ट्रातील ओबीसी राजकीय आरक्षण स्थगित…
एकरी 16 क्विंटल धान खरेदी होणार भंडारा गोंदिया जिल्ह्यातील रब्बी धानाच्या शासकीय खरेदी बाबत महाराष्ट्र राज्य शासनाने पाठविलेल्या चुकीच्या माहितीमुळे धान उत्पादक शेतकरी काळजीत पडला होता. शेतकऱ्यांची ही चिंता दूर करण्याच्या दृष्टीने खा. सुनिल मेंढे यांनी दिल्ली येथे अधिग्रहण आणि सार्वजनिक वितरण धोरणाचे संचालक (Policy Director) श्री. मकरंद फडके यांच्याशी चर्चा केली. राज्य शासनाने केंद्राला पाठविलेल्या अपुऱ्या व त्रोटक माहितीमुळे मागील वर्षीएवढे धान खरेदीचे उद्दिष्ट केंद्र शासन देऊ शकले नाही. धानाबाबतची योग्य माहिती पाठविल्यावर धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्यात येईल. तसेच दोन्ही जिल्ह्यातील कोणताही धान उत्पादक शेतकरी शासकीय धान खरेदी पासून वंचित राहणार नाही या दृष्टीने केंद्र सरकार सर्वतोपरी काळजी…
मांढळ येथील घटना लाखांदूर:बहिणीच्या घरी वाढलेल्या पोटच्या पोराचे लग्न आईवडिलांना विश्वासात न घेता बहिनीने परस्पर उरकून दिल्याच्या आरोपात संतप्त भावाने बहिणीच्या पाठीत चाकूने वार करुन गंभीर जखमी केले. सदर घटनेची पोलिसात तक्रार होताच धास्तावलेल्या भावाने 16 मे रोजी सकाळच्या सुमारास विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक माहिती देण्यात आली आहे. गोविंदा अर्जुन कांबळे (55) रा.मांढळ असे घटनेतील विष प्राशनकर्त्या भावाचे नाव आहे तर मैना दादाजी चंडीमेश्राम (60) रा. जुनोना ता.पवनी असे भावाच्या चाकू हल्ल्यात जखमी बहिनीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, घटनेतील विष प्राशनकर्त्या भावाचा महेश नामक मुलगा गत 14 वर्षापासून घटनेतील चाकू हल्ल्यात जखमी बहिणीकडे राहत होता. दरम्यान बहिणीकडे…
भंडारा : भंडारा येथून वरठी येथील सनफ्लॅग कंपनीकडे जाणाऱ्या वाहनाचा मध्यरात्री भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात सनफ्लॅग कंपनीचे टेक्निशियन रमेश टंडन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, डेप्युटी मॅनेजर युवराज भूरे हे गंभीर जखमी झाले. हे दोघेही मोहाडी तालुक्यातील वरठी येथील सनफ्लॅग कंपनीत नोकरीवर आहेत. काही महत्त्वाच्या कामाकरिता हे दोघेही रमेश टंडन यांच्या चारचाकी वाहनाने भंडारा येथे आले होते. काम आटोपून दोघेही वरठीकडे परत निघाले होते. दरम्यान, सिरसीजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला जबर धडक दिली. यात टंडन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, गंभीर जखमी झालेल्या भुरे यांना प्रथम जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे नेण्यात आले.…
पवनी पोलिसात चालक, मालकाविरुद्ध गुन्हा भंडारा : बिना परवाना मुरुमाची वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई करण्यासाठी पंचनामा करून तो ताब्यात घेतला. दरम्यान, टिप्पर मालकाने मंडळ अधिकाऱ्यावर हातोडा उगारून टिप्पर पळवून नेल्याची घटना पवनी तालुक्यात घडली. नत्थू शेंडे असे फिर्यादी मंडळ अधिकाऱ्यांचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीवरून पवनी पोलिसांनी टिप्पर चालक विनोद शहारे, क्रीष्णा सावरबांधे दोघेही रा. आसगाव या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंडळ अधिकारी शेंडे हे महसूल विभागाच्या पथकासह रात्र गस्तीवर असताना हा प्रकार बाचेवाडी ते निघावी मार्गावर घडला. टिप्पर मालक क्रीष्णा सावरबांधे याने महसूल पथकाला धमकावत, टिप्पर कसा नेता पाहून घेतो, असे म्हणत हातोडा उगरला. त्यानंतर टिप्परमधील मुरूम घटनास्थळीच…
भंडारा जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांचे आवाहनपवनी :- जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून कार्यकर्त्यांनी ओढवून घेतलेल्या नाराजीच्या सुराप्रती मी संवेदनशील असून याचा परिणाम पक्ष संघटनेवर होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी नाराजी नाट्य बंद करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी केले.ते पुढे म्हणाले, ‘पदापेक्षा पक्ष मोठा’ याचे भान ठेऊन प्रत्येक कार्यकर्त्यांनी वागले पाहिजे. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत घडलेल्या घडामोडी माझ्यावर निष्ठा असणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी दुःखाच्या असल्या तरी सार्वजनिकरित्या पक्षाच्या हिताच्या नाहीत. माध्यमात अथवा व्हाट्सएप ग्रुपवर रोज येणाऱ्या पोस्ट माझ्या कार्याचा उहापोह करणाऱ्या जरी असल्या तरी पक्षासाठी घातक आहेत असे सांगतांना कार्यकर्त्यांनी संयम आणि धीर ठेवावा. मी जिल्ह्यात वडीलधाऱ्याच्या भूमिकेत असल्याने लहान व्यक्तींचे हट्ट व लाळ…
जावयाचा मृत्यू तर पत्नीसह सासरची मंडळी गंभीर भंडारा : वृध्द आजस सासूला भेटायला जाणाऱ्या भंडारा येथील एका कुटुंबाच्या वाहनाला नागपूर येथे भीषण अपघात झाला. यात जावयाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, पत्नीसह सासरची मंडळी गंभीर जखमी झाले. यात दोन वर्षीय बालिका सुखरूप बचावली. हा अपघात नागपूर येथे घडला. सागर सुभाष भुरे (३२) रा. गांधी वार्ड गणेशपूर, भंडारा असे मृतक जावयाचे नाव आहे. तर, पत्नी कांचल, कृष्णकांत मोटघरे (सासरे), सुनंदा मोटघरे (सासू), कृणाल मोटघरे (साळा) हे गंभीर जखमी आहे. तर, या भीषण अपघातात मृतक सागरची दोन वर्षीय बालिका किमी ही सुखरूप बचावली. मृतक सागरची सासुरवाडी भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील…
भंडारा : मेथीच्या आळणासाठी (भाजी) आई-वडिलांना शिविगाळ करणाऱ्या दिराला मोठ्या वहिनीने हटकल्याने दीराने चक्क वहिनीच्या गालावर ब्लेडने हल्ला केला. अंगावर काटा आणणारी ही संतापजनक घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथे घडली आहे.देवका वासुदेव तलांजे (वय 40) असे जखमी वहिनीचे नाव असून नरेश गोविंद तलांजे (वय 35) असे आरोपी दीराचे नाव आहे. या घटनेनंतर आरोपी दीर फरार झाला असून त्याचा करडी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (Bhandara Latest Marathi News)मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नरेशच्या आईने सायंकाळी भाजीसाठी विशेष नसल्याने मेथीचे आळण बनविले होते. मात्र नरेशला ते आवडले नाही. जेवणात दुसरी भाजी का केली नाही त्यावरून त्याने आई आणि वडिलांना शिविगाळ सुरु…
एका रात्रीत तीन चारचाकीसह सहा दुचाकी माथेफिरूंनी पेटवल्या जळगाव : शहरातील आदर्श नगर परिसरातील वेगळ्यावेगळ्या ठिकाणच्या तीन घटनांमध्ये तीन चारचाकी आणि सहा दुचाकी अज्ञात माथेफिरूंनी पेट्रोल टाकून पेटवून टाकल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घडला. वाहनांना पेटविल्याच्या या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. अक्षरश: पाच दुचाकी आगीत खाक होवून त्यांचा केवळ सांगाडा उरला होता. दरम्यान, काही माथेफिरू हे सीसीटीव्ही कॅमेल्यात कैद झाले असल्याची माहिती मिळाली आहे. आदर्श नगर परिसरात एसएसडी हाईट्समध्ये रहिवासी राजेश सावंतदास पंजाबी यांचे इमारतीचे काही बांधकाम अद्याप बाकी असून खाली सुरक्षारक्षक देखील परिवारासह राहतो. गुरूवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात तीन माथेफिरू तरूणांनी एक साडी…
५-६ फटके दिल्यांनतर अक्कल येईल’ मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीका केल्यानंतर अभिनेत्री केतकी चितळेवर जोरदार टीका होत आहे. केतकीने फेसबुकवर शरद पवार यांच्यावर एक पोस्ट शेअर केली आहे. या प्रकरणी तिच्यावर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठेंबरे यांनी केतकीचा समाचार घेतला आहे. महाराष्ट्र टाईम्सशी बोलताा रुपाली पाटील म्हणाल्या मुळात केतकीचे मानसिक संतुलन बिघडले आहे आणि जरी मानसिक संतुलन बिघडले असले तरी ती अन्ना ऐवजी शेण खात नाही. तिने ज्यांच्यावर टीका केली आहे ते फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नाही तर राजकारणातील आताचे जेष्ट आणि ज्यांच्या पिढ्या न् पिढ्या राजकारणात आहेत अशांचे मार्गदर्शत आदरणीय शरद पवार…
ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अभिनेत्री केतकी चितळेने फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टवरून मोठ्या वादाला सुरूवात झाली आहे. केतकीच्या विरोधात ठाणे आणि पुण्यात गुन्हा दाखल झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसने तिच्या अटकेची मागणी केली आहे. अशात पक्षाचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केतकीवर हल्ला चढवला आहे. केतकीने ज्यापद्धतीने टीका केली आहे, त्यातून त्यांच्या मनातील विकृती बाहेर आली असून यावर महाराष्ट्रातील सर्व स्थरातून टीका होत आहे. आमच्या भगिनी (केतकी) जे काही लिहले आहे, ते अत्यंत घाणेरडेपणाचे आहे, असे आव्हाड म्हणाले. शरद पवार हे मनाने खुप मोठे आहेत आणि मी जर पूर्वीचा जितेंद्र आव्हाड असतो तर आता ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहे तशा पद्धतीने व्यक्त झालो…
पण दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक नाही’; नितेश राणे मुंबई : आभाळाएवढं व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे‘ या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. प्रसाद ओक अभिनीत ‘धर्मवीर’ सिनेमा काल आज १३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. खरंतर, ठाणे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा सिनेमा प्रदर्शित झाल्याने कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे. अशात भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. निलेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेवर टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहलं की, ‘बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री, शिष्य एकनाथ शिंदे कॅबिनेट मंत्री, मुलगा खासदार, स्व. आनंद दिघे साहेबांच्या घरात…
भंडारा : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक १० मे ला पार पडली. या निवडणुकी दरम्यान सभागृहात भाजपच्या दोन गटात वाद निर्माण होऊन प्रकरण हाणामारीवर पोहोचले. दरम्यान, भाजपच्या महिला जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरी नेवारे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटले. या प्रकरणी महिला सदस्याच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसात जिल्हा परिषदचे नवनियुक्त उपाध्यक्ष संदीप टाले यांच्यासह तुमसर पंचायत समितीचे सभापती नंदू रहांगडाले, जिल्हा परिषद सदस्य उमेश भास्कर पाटील यांच्याविरुद्ध महिलेच्या तक्रारीवरून विनयभंगासह ऍट्रॉसिटी अंतर्गत भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. तर, उपाध्यक्ष संदीप टाले यांच्या तक्रारीवरून भाजपचे गटनेता विनोद बांते, जिल्हा परिषद सदस्य प्रियांक बोरकर,…
डॉक्टर पुत्र दरोड्याचा मास्टरमाईंड,जिल्ह्यात खळबळ Bhandara Crime Updates : भंडारा जिल्ह्यात एका डॉक्टराच्या मुलाने दुसऱ्या एका प्रतिष्ठित डॉक्टरच्या घरी दरोडा टाकण्याचा प्लॅन केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळं हा प्लॅन फिस्कटला आणि डॉक्टर पुत्रासह सहाजणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.ही घटना भंडारा जिल्ह्यातील साकोलीमध्ये (Bhandara Sakoli News) घडली आहे. साकोलीच्या एका प्रतिष्ठित डॉक्टरच्या घरी दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या सहा दरोडेखोरांना मोठ्या शिताफीने भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. पहाटे साकोली तालुक्यातील वलमाझरी फाट्यावर अटक केली आहे. या दरोडेखोरांमध्ये साकोली तालुक्यातील एका डॉक्टर पुत्राचा समावेश असून तोच मास्टरमाइंड असल्याचे सांगण्यात येत आहे. अरविंद डोंगरवार असं या डॉक्टर पुत्राचं नाव आहे. अरविंदसह सूरज जयस्वाल, मिलिंद…
सन 2010 रोजी स्नेहल गजभिये हे भंडारा जिल्हा पोलीस प्रशासनात भरती झाले- संगणकीय व इतर तांत्रीक ज्ञानाच्या अनुभवाने त्यांची क्राईम ब्रांच तसेच सायबर क्राईम सेल येथे विविध गोपनीय कामकाजाकरीता नियुक्त करण्यात आले- क्राईम ब्राॅच येथे नियुक्तीस असतांना दिवस रात्र कामकाज करून खुन] दरोडे] जबरी चोरी यासारख्या गंभीर गुन्हयांचा छडा लावण्यात यांनी मोलाची भुमीका बजावलेली आहे या प्रशंसनीय कामकाजाकरीता त्यांना सन 2019 रोजी मा- पोलीस महासंचालक मंुबई यांचेकडुन उत्कृष्ट अन्वेषण व अपराधसिध्दी या पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे- त्यांच्या तांत्रीक ज्ञानाच्या अनुभवाने त्यांचेकडे सायबर सेलची जबाबदारी दिली होती- सायबर सेल येथे कार्यरत असतांना विविध तांत्रीक गुन्हे व तपास] सायबर जनजागृती] सायबर गुन्हे…
100 हून अधिक झोपडय़ांना आग बेलतरोडी परिसरातील महाकाली नगर झोपडपट्टीला सोमवारी सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. यात जवळपास शंभर झोपडय़ा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली 20 ते 25 गॅस सिलिंडर्सचे स्फोट झाल्याने परिसरातील नागरिक दहशतीत होते. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी आगीमुळे शेकडो लोकांचा संसार उघडय़ावर पडला, त्यामुळे परिसरात आक्रोशाचे चित्र होते. सकाळी 10 वाजेच्या सुमारास अचानक मोठा स्फोटाचा आवाज झाला व त्यानंतर झोपडय़ांमध्ये आग लागली. झोपडपट्टी मोठी असून, झोपडय़ा आजूबाजूला लागून असल्याने आग वेगाने पसरली. अग्निशमन दलाचे पथक पोहोचण्याअगोदरच शंभराहून अधिक झोपडय़ा आगीच्या विळख्यात सापडल्या होत्या.…
परिसरात खळबळ; जिलेटिनच्या 55 कांड्या पाहून पोलीसही चक्रावले नागपूर : रेल्वे स्टेशनसारख्या गजबजलेल्या परिसरात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रेल्वे स्टेशनच्या (Railway Station) मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या ट्राफिक पोलीस चौकीच्या मागेच एक बॅग आढळून आली.माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक (Bomb Squad) घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी बॅग ताब्यात घेतली. या बॅगेत जिलेटिनच्या 55 कांड्या एकमेकांशी सर्किटने जोडलेल्या स्वरुपात होत्या. त्यामुळे परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी ती बॉम्ब सदृश्य वस्तू ताब्यात घेत पोलीस मुख्यालय (Police Headquarters) परिसरात नेली. रेल्वे स्टेशन परिसरात अशाप्रकारे बेवारस बॅगमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.जिलेटिनच्या कांड्या सर्किटद्वारे एकमेकांना जोडलेल्या…
मुंबई: स्टँड-अप कॉमेडियन मुनावर फारुकी एकता कपूरच्या लॉक अप सीझन 1 मध्ये त्याच्या विजयाचा आनंद घेत आहे. त्याने अंजली अरोरा आणि पायल रोहतगी यांना पराभूत करून प्रतिष्ठित ट्रॉफी, 20 लाख रुपयांची बक्षीस रक्कम आणि एक आकर्षक एर्टिगा कार मिळवली. पायल कॅप्टिव्ह रिअॅलिटी शोची उपविजेती म्हणून उदयास आली. कॉमेडियन ट्रेंड करत असताना आणि त्याच्या विजयासाठी सर्वत्र मथळे निर्माण करत असताना, असे काहीतरी आहे ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रविवारी इन्स्टाग्रामवर जाताना मुनावर फारुकी यांनी एका अनोळखी महिलेसोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला. त्याने तिच्या चेहऱ्याचा काही भाग हार्ट स्टिकरने लपवला होता. “बबी बबी तेरा नी मै,” त्याने चित्राला कॅप्शन दिले आणि त्यात…
रवींद्रनाथ टागोर : जयंती महान कवीची जयंती साजरी करते, जे त्यांच्या काळाच्या पुढे आहेत, ते लेखक, चित्रकार, तत्वज्ञानी आणि लघु कथा लेखक देखील होते. देशाच्या बंगाली साहित्याच्या लँडस्केपवर त्यांनी कायमचा ठसा उमटवला होता, गीतांजली या त्यांच्या अपवादात्मक कार्यासाठी 1913 साली साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले गैर-युरोपियन होते. टागोर यांचा जन्म 7 मे 1860 रोजी झाला आणि त्यांनी केवळ साहित्यातच महत्त्वाची भूमिका बजावली असे नाही तर त्यांच्या कवितांमधून राष्ट्रवादाची भावना जागृत करून भारतीय स्वातंत्र्य चळवळीतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ 1915 मध्ये, ब्रिटिश राजा जॉर्ज पंचम यांनी त्यांना नाइटहूड प्रदान केला होता, ज्याचा नंतर त्यांनी 1919 मध्ये…
फर्स्ट-लूक पोस्टर्स पहा साई पल्लवी आज 9 मे रोजी तिचा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी तिने गार्गी या तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. तिने गार्गीचे फर्स्ट-लूक पोस्टर्स अनेक भाषांमध्ये शेअर केले आहेत. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रिची फेम गौतम रामचंद्रन यांनी केले आहे. गार्गी थिएटरमध्ये रिलीज होणार की ओटीटीचा मार्ग स्वीकारणार हे स्पष्ट नाही. लवकरच निर्माते रिलीजची तारीख जाहीर करतील. आज, 9 मे रोजी ती 30 वर्षांची झाली आणि या खास प्रसंगी तिने गार्गी या तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. चित्रपटाचे दिग्दर्शन गौतम रामचंद्रन यांनी केले आहे. इन्स्टाग्रामवर जाताना पल्लवीने खुलासा केला की या चित्रपटाबद्दल बोलण्यासाठी…
सभापतींचा नवा संकल्प : शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहचविणार भंडारा : कोरोनाच्या काळात शासकीय निधीची वणवा होती. त्यामुळे अनेकांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला नाही. नागरिकांना पंचायत समितीमध्ये अनेकदा खेटा घालाव्या लागल्या. अशा प्रत्येक नागरिकांना शासकीय नियमानुसार योजनांचा लाभ देण्याचा आपला प्रयत्न राहील. किंबहुना नागरिकांना शासकीय योजनांची माहिती व्हावी आणि त्याचा लाभ मिळावा यासाठी नागरिकांच्या समस्यांचा निपटारा त्यांच्या गावात व्हावा, यादृष्टीने पाहिले पाऊल उचलले जाणार आहे. जिल्हा परिषद निहाय जनता दरबार घेऊन नागरिकांच्या समस्या त्यांच्याच दारात सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया साकोली पंचायत समितीचे नवनियुक्त सभापती गणेश आदे यांनी दिली. ग्रामीण नागरिकांना शासकीय योजनांची पूर्ण माहिती नसल्याने त्यांना योजनेपासून वंचित रहावे…
अड्याळ येथील थरार : सायकलने पळून जाणाऱ्या मुलाला राष्ट्रीय महामार्गावर अटक भंडारा : शेतीसह सर्व संपत्तीचे हिस्से वाटणी करावी या मागणीला घेऊन संतप्त मुलाने वडीलांवर कुर्हाडीने वार करुन त्यांची हत्या केली. अड्याळ पोलिस स्टेशन हद्दीतील फनोली या गावात मध्यरात्री घडला. अड्याळ पोलिसांनी आरोपीला भंडाराजवळून अटक केली.शंकर महादेव कावळे (६०) रा. फनोली असे मृतकाचे नाव आहे. तर दुर्योधन शंकर कावळे (३२) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे. मृतक शंकर यांना दोन मुले आहेत. त्यांच्याकडे दोन एकर शेती आहे. मागील काही दिवसांपासून आरोपी दुर्योधन हा वडील शंकर यांच्याकडे शेतीची हिस्से वाटणी करावी, असा तगादा लावीत होता. वडील या गोष्टीला मानत…
सदस्यत्व रद्द करा : सरपंच संघटनेच्या अध्यक्षाची तक्रार भंडारा : साकोलीचे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार मार्तंडराव कापगते यांचे पुत्र तथा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि पंचायत समितीचे सदस्य होमराज कापगते यांनी राज्य निवडणूक आयोगाची दिशाभूल केली आहे. ते सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ उचलत असतानाही त्यांनी निवडणूक नामनिर्देशन अर्जात त्याची नोंद केली नाही. यामाध्यमातून त्यांनी निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याने त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी सरपंच संघटनेचे अध्यक्ष पवनकुमार शेंडे यांनी केली आहे. होमराज कापगते हे यापूर्वी काँग्रेचे जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत. होमराज हे त्यांच्या संस्थेतून प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले असून सेवानिवृत्तीचा लाभ ते घेत आहेत. असे असताना त्यांनी डिसेंबरला…
भंडारातील जनउन्नती बहुद्देशीय संस्थे द्वारा 04 मे 2022 रोजी वाणिज्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी अकाउंट्स, फायनान्स, बँकिंग, इन्व्हेस्टमेंट, व टॅक्सएशन ह्या विषयांवर आधारित पाठ्यक्रमावर ३० दिवस चालणाऱ्या निशुल्क प्रशिक्षण शिबिराचा समारंभ झाला. ह्या शिबिराच्या समारंभ निमित्त भांडाराचे अफ्लाटस अकॅडेमि चे संस्थापक श्री दीप्तीश सपाटे, कॅनरा बँक अधिकारी श्री पियुष कानकोटे आणि संस्थेच्या वतीने CA पंकज मुंधडा उस्थित होते. ह्या कार्यक्रमाच्या द्वारे उपस्थित विध्यार्थाना श्री पियुष कानकोटे ह्याच्याशी संपर्क साधता आला. श्री पियुष कानकोटे ह्यांनी विध्यार्थाना वाणिज्य क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधींची जाणिव करून दिली तसेच बँकिंग क्षेत्रात होणाऱ्या विविध प्रवेश परीक्षे बद्दल माहिती दिली.. श्री दीप्तीश सपाटे ह्यांनी विध्यार्थाना परदेशी भाषेच्या ज्ञानाच्या साहाय्याने…
एलसीबीने केली १० तासात आरोपीला अटक भंडारा : जंगलभ्रमंती दरम्यान मित्रांमध्ये वाद झाला. यातून मित्रांनीच मित्राची धारदार चाकूने हत्या केली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना अटक केली. ही घटना अड्याळ पोलिस स्टेशन हद्दीतील माडगी – तिर्री (मिन्सी) मार्गावरील जंगलात घडली.कुशल भरणे (२७) रा. चांदणी चौक, भंडारा मूळ गाव विठ्ठल गुजरी, पवनी, निखिल मेश्राम (२१) रा. समतानगर फेज २, भंडारा असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. तर, बाळा उर्फ राकेश रामभाऊ कोवे (२७) रा. मुस्लिम लायब्ररी चौक, अन्सारी वॉर्ड, भंडारा असे मृतकाचे नाव आहे. मृतक आणि आरोपी हे तिघेही रविवारला जंगलभ्रमंती आणि भिलेवाडा मार्गावरील एका ढाब्यावर जेवण करायच्या बेताने…
भंडारा : वाळूचा उपसा करून वाहतुक करीत असल्याने शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी संदीप कदम आणि जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी पहाटे वडेगाव (रिठी) वाळू घाटावर कारवाई केली. या कारवाईत ५५ लाख २१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ११ ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहे. तर, दोन चालकांना अटक केली आहे.जयदेव बोरकर रा. बेरोडी, महेंद्र हजारे रा. सुरेवाडा असे अटक करण्यात आलेल्या दोन चालकांची नावे आहेत. भंडारा तालुक्यातील वडेगाव (रीठी) येथून वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्याच्या माहितीवरुन जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड, तहसीलदार अरविंद हिंगे, कारधाचे ठाणेदार राजेशकुमार…
चंद्रपूर / नागपूर – कोल्हापूर बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाचे केलेल्या कामाचे उर्वरित बिलाकरीता व उर्वरित रक्कम वितरित… चंद्रपूर / नागपूर कोल्हापूर बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाचे केलेल्या कामाचे उर्वरित बिलाकरीता व उर्वरित रक्कम वितरित करण्याकरिता मृद जलसंधारण विभाग नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना 50 लाख रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांनी रंगेहात अटक केल्याने एकच खळबळ उडाली तक्रारदार हे नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांच्याकडे मृद व जलसंधारण कार्यालय जि. नागपूर व जि. चंद्रपूर येथे कोल्हापूर बंधारा सर्वेक्षणाचे काम होते, काम पूर्ण झाल्यावर जलसंधारण विभागात बिले सादर केल्या गेले, पण बिलाची रक्कम काढून देण्यासाठी जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा प्रादेशिक जलसंधारण अधिकारी वर्ग 1…
मृतकाच्या भावाचाही पाण्यात बुडून मृत्यू : भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील घटना भंडारा : कौटुंबिक कलहातून जावयाने सासऱ्याचा खून करून मृतदेह गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात फेकला. मृतदेह काढण्यासाठी कालव्यात उतरलेल्या भावाला पोहता येत नसल्याने त्यांचाही कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यात घडली. हरी नागपुरे रा. सिंधी असे मृतक सासाऱ्याचे नाव आहे. त्यांचा मृतदेह काढण्यासाठी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या भावाचे नाव चंद्रभान नागपूरे असे आहे. तर, सासाऱ्याचा खून केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या जावयाचे नाव अनिल हटवार रा. वाही असे आहे. आरोपी जावई अनिल हटवार याला पवनी पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रीना…
हत्ये प्रकरणी दोन आरोपींना अटक भंडारा : दिनांक 28/04/2022 रोजी ग्राम नवेगाव ( कोका ) लगत असलेल्या वनविभागाच्या संरक्षित वनात नवेगाव येथिल बबिता तिरपुडे रा .नवेगाव( कोका ) हिचा कोणीतरी अज्ञात इसमाने तिच्या डोक्यावर काठी मारून व तिचा गळा दाबुन खुन केल्याचे फिर्यादीच्या तक्रारीवरून पो.स्टे . कारधा येथे कलम 302 भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदरच्या गुन्ह्याचे तपासात गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे संशईत आरोपी( 1 )राजहंस कुंभरे,( 2 ) विनोद रामटेके दोन्ही रा. नवेगाव( कोका )यांना ताब्यात घेवून गुन्ह्याचे संबंधाने सखोल विचारपुस केली असता आरोपी राजहंस कुंभरे याने मृतक महिला बबिता तिरपुडे हिने जादूटोणा केल्यामुळेच त्याची पत्नी…
भंडारा : रेतीच्या वाहतुकीचा परवाना नसतानाही जिल्ह्यातून रेतीची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. अशाच एका रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीस्वार मायलेकाला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार दोघांचाही घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. ती घटना मोहाडी तालुक्यातील सातोना येथे सोमवारला सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. गीता रहांगडाले आणि राजू रहांगडाले असे मृतक मयलेकाचे नाव आहे. मृतक मायलेक हे नागपूर जिल्ह्यात असून ते दुचाकीने तिरोडा येथे जात होते. तर, अपघाताला कारणीभूत टिप्पर हा नागपूरच्या दिशेने जात होता. वरठी पोलिसांनी टिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
रेस्टॉरंट मालकाला अटक: दुसऱ्याचा शोध सुरू भंडारा : करडी येथील एका रेस्टॉरंटच्या मागे सुरू असलेल्या आयपीएलच्या सट्टयावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला. यात रेस्टॉरंट मालकाला मुद्देमालासह अटक केली. ही कारवाई शनिवारी रात्री केली.अविनाश केशव बावनकर (३३) रा. ग्रामपंचायत चौक, सुभाष वॉर्ड, करडी असे अटक करण्यात आलेल्या रेस्टॉरंट मालकाचे नाव आहे. अविनाश याचे करडीत अविनाश रेस्टॉरंट आहे. येथून अविनाश हा तुमसर येथील शेखर उर्फ सोनू अग्रवाल (३२) याच्या सांगण्यावरून आयपीएलच्या क्रिकेट मॅचवर पैशाची बाजी लावून नागरिकांकडून पैसे घेऊन आकडे उतरवित होता. या मिळालेल्या माहितीवरून भंडारा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला.या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अविनाश बावनकर याच्या…
भंडारा : वाळू तस्करीवर आळा घालण्यासाठी गेलेल्या भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत यांच्यावर वाळू तस्करांनी प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणात फरार झालेले प्रहार संघटनेचे पवनी तालुकाध्यक्ष अक्षय तलमले याना अटक करण्यात आली आहे. तर, या हल्ल्यात शिवसेनेचे काही पदाधिकारी सहभागी असल्याचे समोर आले असून, ते फरार झाले आहेत. यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड हे मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्यासह २७ एप्रिलच्या पहाटे पवनी तालुक्यात सुरू असलेल्या वाळू वाहतुकीच्या कारवाईसाठी गेले होते. दरम्यान, तीन टिप्पर अडविल्यानंतर अचानक २० ते २५ तस्करांनी लाठ्याकाठ्या आणि हातात फावडे घेऊन घटनास्थळ गाठत राठोड यांना मारहाण केली. त्यांच्या बचावासाठी…
आरोपींच्या मोबाईलचा सीडीआर तपासणार दोन वर्षात रेती तस्कारांवर ७३ गुन्हे दाखल १४५ आरोपींना अटक भंडारा :उपविभागीय दंडाधिकारी भंडारा रविंद्र शंकर राठोड हे अवैध रेती वर कायदेशीर कारवाई करण्याकरीता आपल्या स्टाफ सह पवनी तालुक्यातील गेले असता मौजा बेटाळा येथे रेती तस्कराकडुन झालेल्या भ्याड हल्ल्याची आम्ही कसुन चौकशी करीत आहोत . याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून १८ फरार आरोपींचा शोध घेणे सुरु आहे . रेती तस्कारांच्या मुसक्या आवरण्याकरीता पोलीस विभाग सतत कार्यरत असून दोन वर्षात रेती तस्करांवर ७३ गुन्हे दाखल करण्यात आले असून १४५ आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी आज पत्रपरिषदेत दिली…
एसडीओ मारहाण प्रकरणाचा तपास चुकीच्या अधिकाऱ्याकंडेतर पालकमंत्र्यांचा निषेध व आंदोलन अवैध वसुली करणारा छोटा एसपी कोण? भंडारा : – जिल्हयात सध्या पोलीस विभागाचा जो प्रकार सुरू आहे, तो लाजीरवाना आहे. फक्त वसुली हाच प्रकार पोलीस विभागात सुरु आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. गुन्हेगारांना संरक्षण मिळत आहे, तर फिर्यादीला आरोपी करण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यातील पोलीस विभागच अपंग झाला आहे. गुन्हेगारात पोलिसांचा कोणताही धाक राहिला नाही, असा आरोप भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र मोंडेकर यांनी आज विश्रामगृह भंडारा येथे घेतलेल्या पत्रपरिषदेत केला आहे.आ. नरेंद्र मोंडेकर पुढे म्हणाले, दोन दिवसापूर्वी पवनी तालुक्यात उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र राठोड व एपीआय राऊत यांच्यावर…
संबधित घटनेच्या व्हिडिओ स्थानिक आमदारांनी दिला प्रसारमाध्यमांना… पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाही करण्याची स्थानिक आमदारांची केली मागणी… भंडारा उपविभागीय अधिकारी यांना मारहाण करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्यां पवनी पोलिसांचा आरोपी सोबतच मटण पार्टी करतांना एक व्हिडिओ सद्धा जोरदार वायरल झाला असून हा व्हिडिओ भंडारा- पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदारांनी प्रसारमाध्यमांना दिला आहे. हा वीडियो दाखवत पोलिस आणि वाळू माफ़िया यांचे संबध किती मधुर असल्याची आरोप नरेंद्र भोंडेकर यांनी केला. अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपीना पवनी पोलिस कसे पकडतील असा प्रश्न उपस्थित करत असा पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाही करण्याची स्थानिक आमदारांची मागणी केली. विशेष म्हणजे पार्टी करतांना त्या पोलिस कर्मचाऱ्यांचे संभाषण मोठा धक्कादायक खूलासा करीत आहे. https://youtu.be/b0_JoDuVsj4…
प्रतिनिधी/भंडाराभंडारा जिल्ह्यात रेती माफीयांना पोलीस प्रशासनातर्फे संरक्षण दिले जात असल्यामुळे भंडारा जिल्ह्यात गुन्हेगारीला उधान आले आहे. एसडीओ राठोड यांच्यावरील हल्ल्याला पोलीस प्रशासनच जबाबदार असून जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव व पवणीचे ठाणेदार गायकवाड यांना तात्काळ निलंबित करावे अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा पवनी तालुका शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे. तहसीलदार पवनी मार्फत मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना देण्यात आले आहे.दि. 26 एप्रिलच्या रात्री 3.30 वा. उपविभागीय अधिकारी श्री. रविंद्र राठोड अवैध रेती तस्करी विरूध्द कार्यवाही करीत असतांना 50 ते 60 रेती माफीयांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. महिन्याभरापूर्वी मोहाडीच्या तहसिलदारावर अशाच पध्दतीचा हल्ला झाला होता. अशा…
नागपूर : अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बॉयफ्रेंडध २ सख्या भावांनी सामूहिक बलात्कार (Atrocities) केल्याची खळबळजनक घटना जरीपटका पोलिस (police) ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी (police) बॉयफ्रेंड यश कांबळे (वय-१९, रा. इंदोरा) याला अटक करण्यात आली आहे. तर ऋषिल खोब्रागडे (वय-१९) आणि रक्षित खोब्रागडे (वय-२१) या २ भावांचा शोध पोलिस घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी ही १७ वर्षांची आहे. ती अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. तर यश हा मोलमजुरी करत असतो. एकाच वस्तीत राहत असल्यामुळे तिची यशबरोबर ओळख होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत नंतर प्रेमात झाले. दोघे देखील २०२० पासून प्रेम संबंधात होते. दरम्यान, मुलीला दुसऱ्या युवकाबरोबर प्रेम झाले. यामधून दोघांमध्ये…
औरंगाबादः तांदळाच्या दुकानातून हवाला रॅकेट (Hawala Racket) चालवणाऱ्या एकाचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. शहरातील शहगंजहून (Shahganj) चेलीपुऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सुरेश राईस किराणा दुकानात छापा मारून पोलिसांनी ही कारवाई केली. मंगळवारी संध्याकाळी गुन्हेशाखेने (Crime Branch) ही कारवाई करत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. या ठिकाणाहून तब्बल 01 कोटी साडेनऊ लाख रुपये जप्त करण्यात आले. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास येथील किराणा व्यापारी आशिष सावजी यांना मशीनने नोटा मोजत असतानाच गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. सावजी हवाला रॅकेट चालवत असावा, तशा नोंदीही त्याच्याकडे सापडल्या असून पोलीस आता या प्रकरणाच्या मूळापर्यंत जाण्यासाठी तपास करत आहेत. किराणा सामानाचे मागे नोटांची बंडलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहागंज…
भंडारा : गुजरातचे काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवानी यांना आसामच्या पोलिसांनी अटक केली. ही अटक बेकायदेशीर असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मेवानी यांची त्वरित सुटका करावी यासह महागाईच्या विरोधात भंडारा काँग्रेसने राष्ट्रीय महामार्गावरील एका पेट्रोल पंपावर जुमला आंदोलन केले. भंडारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहन पंचभाई, महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश मेश्राम यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. या निवेदनात, गुजरातच्या वडगाव येथून निवडून आलेले आमदार जिग्नेश मेवानी यांनी पंतप्रधानांविरुद्ध ट्विट केल्याने त्यांच्यावर आसाम येथे गुन्हा नोंद करून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. ही अटक बेकायदेशीर असून त्यांना तातडीने सोडावे, अशी…
औरंगाबाद: राज्यात मनसेकडून (Maharashtra Nav Nirman Sena) ज्या भोंग्यावरुन राजकारण सुरु करण्यात आले. जो भोंगा आणि हनुमान चालीसावरुन (Hanuman Chalisa ) आमदार, खासदार असणारे राणा दांपत्याला कोठडीची हवा खावी लागली, त्याप्रकरणावरुन आता औरंगाबादमध्ये राज्यातील पहिला गुन्हा दाखल केला गेला आहे. मस्जिदीकडे भोंग्याचे (Loudspeaker) तोंड करुन गाणे वाजवल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून रेल्वे पोलीस दलातील कर्मचारी किशोर गंडापा मलकूनाईक यांच्या विरोधात सातारा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्या या सभेला काही राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. त्यामुळे हा वाद ताजा असतानाच हा…
‘नवनीत राणा यांनी घेतलेल्या कर्जाबाबत ईडीनं तपास करायला हवा.’ खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी दाऊदशी संबंधित युसूफ लकडावाला याच्याकडून 80 लाखांचं कर्ज घेतलं, असा सनसनाटी आरोप शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय. नवनीत राणा यांनी घेतलेल्या कर्जाबाबत ईडीनं तपास करायला हवा. हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याचंही राऊत यांनी म्हटलंय. ईडी (ED) या प्रकरणाची चौकशी करेल का? असा सवालही त्यांनी ट्विटद्वारे उपस्थित केलाय. काय म्हणाले संजय राऊत? ‘तुरुंगात मरण पावलेल्या युसूफ लकडावाला (Yusuf Lakdawala) याच्याकडून नवनीत राणा यांनी 80 लाखांचं कर्ज घेतलं होतं. त्याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. https://twitter.com/rautsanjay61/status/1518967736696668160?t=zM6dHooVHZwyl7WUg0fZEQ&s=19 युसूफ लकडावाला याचे डी. गँगशीही संबंध…
येरवडा : कामावरून काढून टाकल्याचा राग डोक्यात घेऊन कामगाराने मालकिणीला पेट्रोल ओतून जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार वडगावशेरी येथे घडला. या घटनेत मालकिणीसह कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बाला जॉनी (वय 32) व मिलिंद नाथसागर (वय 35, दोघेही रा. रामचंद्र सभागृह वडगावशेरी) या दोघांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. बाला जॉनी यांचे वडगावशेरी येथील रामचंद्र सभागृह येथे ए टू झेड टेलरिंगचे दुकान आहे. मिलिंद हा बाला हिच्या दुकानात मागील दोन वर्षांपासून काम करत होता. मागील आठवड्यात त्याला बाला यांनी कामावरून काढून टाकले होते. त्याचा राग डोक्यात ठेवून मिलिंद याने बाला हिच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. या घटनेत बाला व मिलिंद दोघेही…
मुंबई, 26 एप्रिल: गेल्या दोन वर्षांपासून कोरोनानं संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. अनेकांनी यामुळे आपले प्राण गमावले आहेत. भारतातही तिसरी लाट येऊन गेली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातही कोरोना पूर्णपणे नाहीसा झाला आहे असं चित्रं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये कॉलेजेसही ऑफलाईन (Offline Colleges in Maharashtra) पद्धतीनं सुरु झाले आहेत. मात्र गेली दोन वर्ष ऑनलाईन शिक्षण (Online Education) घेतल्यामुळे ऑफलाईन परीक्षेला (Offline exams in Maharashtra) विद्यार्थ्यांचा विरोध होता. मात्र आता राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन (Offline exams in All universities in Maharashtra) पद्धतीनं घेण्यात येणार आहे. उच्च शिक्षणमंत्री आणि कुलगुरू यांच्या बैठकीच्या…
Navneet Rana Mumbai Police : मागासवर्गीय असल्याने पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा दावा खासदार नवनीत राणा यांनी केला होता. याबाबतचे एक पत्र लोकसभा अध्यक्षांना लिहिले होते. नवनीत राणा यांना मुंबई पोलिसांवर हे आरोप करणे भोवणार असल्याची चर्चा आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्वीट करत खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना आदराची वागणूक देण्यात आली असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे नवनीत राणा यांचा ‘दलित कार्ड’चा प्लॅन फेल झाला असल्याची चर्चा सुरू आहे. आता मुंबई पोलिसांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी नवनीत राणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. नवनीत राणा यांचा पोलिसांविरोधात अँट्रासिटी केस दाखल करण्याचा प्रयत्न होता अशी माहिती सूत्रांनी दिली.…
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver Oak) निवास्थानावर हल्ला करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) अखेर 18 दिवसांनी तुरुंगातून बाहेर आले आहेत.सदावर्तेंना 8 एप्रिल रोजी मुंबईतील त्यांच्या निवास्थानातून सिल्व्हर ओक येथील हल्ल्यामागे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे माथी भडकवल्याचा आरोप करत अटक करण्यात आली होती. मात्र, आता अखेर तब्बत 18 दिवसांनी सदावर्ते बाहेर आले आहेत. तुरुंगातून सुटका होताच सदावर्तेंनी हा हिंदुस्थान्यांचा विजय असल्याचे म्हटले आहे. (Adv. Gunaratna Sadavarte Released From Jail )तुरुंगातून बाहेर पडताना सदावर्ते म्हणाले की, या कठीण काळात माझा मित्र परिवार, हिंदुस्थानातील जनता आणि कष्टकरी बांधन माझ्यासोबत राहिले. तसेच येथून आमचा…
रत्नागिरी, 26 एप्रिल, (हिं.स.) : गवाणे (ता. लांजा) येथील शाळेतील मुख्याध्यापकाने सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्याने मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्याध्यापकाने मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. मात्र मुख्याध्यापक आपल्याला नापास करतील, या भीतीपोटी मुलीने घरी कल्पना दिली नव्हती. ती मानसिक दडपणाखाली वावरत होती. lr घरात अचानक चक्कर येऊन पडायची. तिच्या अचानक बिघडलेल्या तब्येतीने पालकांनी तिची चौकशी केली तेव्हा सारा प्रकार समोर आला. मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती समजल्यावर पालकांच्या पायाखालची वाळू सरकली. लगेचच ही माहिती पालकांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर गावच्या मंदिरात गावातील मान-मानकरी, गावकरी यांची बैठक…
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्कचे ट्विटर विकत घेण्याचे स्वप्न साकार झाले आहे. एलोन मस्कची ऑफर स्वीकारून कंपनीच्या बोर्डाने विक्रीला मान्यता दिली. इलॉन मस्क यांची 100% भागीदारी आहेइलॉन मस्कने काही काळापूर्वी ट्विटरमध्ये 9% स्टेक विकत घेतला होता. आता इलॉन मस्कने ट्विटर इंक मध्ये 100% हिस्सा विकत घेतला आहे. त्यांनी ट्विटर कंपनी $54.20 प्रति शेअर या दराने विकत घेतली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून ट्विटर कंपनी एलोन मस्कच्या इलॉनच्या ऑफरवर विचार करत होती. आता बोर्डाची संमती मिळाल्यानंतर कंपनीने आता ट्विटरची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष डॉट्विटरच्या स्वतंत्र मंडळाचे अध्यक्ष ब्रेट टेलर म्हणाले: “ट्विटर बोर्डाने अॅलनच्या मूल्य, निश्चितता…
मुंबई – हनुमान चालीसा वाद प्रकरणी अटकेत असलेले राणा दाम्पत्याला मुंबईतील सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. या दोघांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती, पण न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली.आता या प्रकरणावर २९ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. हनुमान चालीसा पठणावरून झालेल्या वादानंतर राणा दाम्पत्याला शनिवारी अटक करण्यात आली होती. राणा दाम्पत्यावर आयपीसीच्या कलम 15ए आणि 353 तसेच मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 135 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सर्वात मोठे कलम 124A म्हणजेच देशद्रोहाचे कलमही लागू करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती ही याचिकायापूर्वी नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन…
मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर चालिसा अट्टाहास अंगलट आलेल्या राणा दाम्पत्याची मुंबई उच्च न्यायालयाने आज चांगलीच कानउघडणी केली आहे. गुन्हा रद्द करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावत तगडा हादरा दिला आहे. विशेष सरकारी वकिलांच्या दाव्यात तथ्य असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. मुंबई पोलीसांनी राणा दाम्पत्यावर 124 अ आणि 353 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात दोन स्वतंत्र एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे दोन एफआयआरविरोधात राणा दाम्पत्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्याची चांगलीच हजेरी घेत फटकारले. याचिकाकर्ते कायद्याचा सन्मान करणारे लोकप्रतिनिधी आहेत, तर त्यांनी पोलीसांना विरोध करण्याचे कारण नव्हते, अशा शब्दात राणा दाम्पत्याला…
नवी दिल्ली: अगोदरच इंधन (Petrol) दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. आता मोबाईल (Mobile) रिचार्जचे दर पुन्हा महागणार आहेत. मोबाईल कंपन्यांनी याअगोदरही दरवाढ केली होती. रिचार्ज पॅकचे दर पुन्हा बदलण्याची तयारी कंपन्यांनी सुरु केली आहे. त्यामुळे मोबाईल डाटा आणि कॉलचे दर वाढणार आहेत. जे ग्राहक सीम वापरत नाहीत, त्या ग्राहकांवर मोबाईल कंपन्यांचे विशेष लक्ष आहे. जे ग्राहक सीम वापरत नाहीत तो नंबर बंद करण्यात येणार आहेत. याचा तोटा भरुन काढण्यासाठी मोबाईल कंपन्या रिचार्जचे दर वाढवणार असल्याचे बोलले जात आहे. सरासरी महसूलामध्ये सुधारणा करण्यासाठी मोबाईलच्या रिचार्जचे दर वाढवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. यासाठी कंपन्या आता स्वस्तातील रिचार्ज (Recharge) करुन सीम कार्ड…
भंडारा: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालय द्वारा देशभर आरोग्य मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. साकोली येथे अशाच आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते झाले.साकोली उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या मेळाव्यात अनेक नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. आवश्यक यांना शल्यचिकित्सा सुचविण्यात आली. आरोग्य मेळाव्याच्या माध्यमातून समाजाचे आरोग्य सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याप्रसंगी बोलताना खा.मेंढे यांनी केंद्रसरकार कोरोना काळात प्रत्येक भारतीयाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली असे सांगितले. मात्र अजूनही ग्रामीण भागात आजारांबद्दल जागृती नाही असे ते म्हणाले, उपजिल्हा रुग्णालय असूनही अनेकदा रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न…
प्रतिनिधी/भंडारा : जय जवान जय किसान संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसीम (टिंकू) खान, पटेलपूरा वार्डातील समासेवक व सद्भावना शारदा मंडळाचे अध्यक्ष राजीव देसाई आणि भाजपाच्या माजी नगरसेविका शमीमा अजीज शेख या तीन प्रमुख नेतयांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज शिवसेनेत प्रवेश केला.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावरील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यपध्दतीमुळे प्रभावीत होऊन स्थानिक धडाडीचे, कर्तव्यनिष्ठ आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या विकासवादी दृष्टीकोनाला पाठींबा देण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केल्याची प्रतिक्रिया या नेत्यांनी केली. येणा-या न.प. निवडणूकीत आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात जिल्हाप्रमुख अनिल गायधने, उपजिल्हाप्रमुख सुरेश धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली न.प. वर निश्चित भगवा फडकविणार असून यापुढेही असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत…
गोंदिया : कुपोषणमुक्तीसाठी शासन आणि प्रशासन स्तरावर मागील काही वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी लाखोचा निधी खर्च केला जात आहे. मात्र, यानंतरही कुपोषणाचे प्रमाण कमी होत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ३०० कुपोषित बालकांची नोंद झाली असून, १८१ बालकांना ग्राम बालविकास केंद्रात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा परिषद, महिला व बाल विकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी व मिनी अंगणवाडीतील ६ वर्षे वयोगटातील १ लाख २३३ बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील ९० हजार ३५० बालकांपैकी ८६,३२१ मुले सर्वसाधारण आढळली, तर दोन हजार बालके मध्यम कुपोषित आढळली. ३०० बालके तीव्र…
पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल भंडारा : घरी अल्पवयीन मुलगी एकटीच असल्याची संधीसाधून एका इसमाने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी आंधळगाव पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.गौतम अरविंद लोणारे रा. वायगाव ता. मौदा जि. नागपूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतम हा मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथे अल्पवयीन मुलीच्या घरी १९ एप्रिलला आला होता. यावेळी अल्पवयीन मुलगी घरी एकटीच असल्याची संधीसाधून सदर इसमाने तिचा विनयभंग केला.पीडित मुलीने घडलेली हकीकत कुटुंबीयांना सांगितली. पालकाच्या तक्रारीवरून आंधळगाव पोलिसांनी गौतमविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपअधीक्षक (गृह) विजय डोळस, उपविभागीय पोलिस…
अकोला प्रतिनिधी संजय चव्हाण अकोला जिल्हा पोलीस दलाकडुन विविध उपक्रम राबविले जातात त्यापैकी आज दिनांक २१.०४. २०२२ रोजी पोलीस अधीक्षक जि. श्रीधर यांचे संकल्पनेतुन “सर्व धर्म सद्भावना संमेलन’या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. जातीय सलोखा वृध्दींगत व्हावा सर्व धर्मांची खरी शिकवण प्रत्येका पर्यंत पोहचावी जेणेकरुन जातीय दंगली घडणार नाही व दहशतवादाला थारा मिळणार नाही या हेतुने दिनांक २१.०४.२०२२ ते ३०. ०४.२०२२ पर्यंत हा उपक्रम प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर राबविण्यात येणार आहे. सदरच्या उपक्रमामध्ये सर्व धर्म समभाव या विषयावर गुरुदेव सेवा मंडळ च्या सर्व धर्मिय सामुदायीक संमेलनाचे आयोजन करून सर्व धर्मिय धर्मगुरू यांचे विशेष हस्ते मार्गदर्शन करण्यात येणार असुन “सर्व धर्माची शिकवण…
गोंदिया: जिल्ह्याच्या आमगाव तालुकाअंतर्गत येणाऱ्या महादेव पहाडी जंगल परिसरात एका १५ ते १७ वर्षीय तरुणीची हत्या करून मृतदेह जंगल परिसरात फेकून दिल्याची घटना प्रथम दर्शनी उघडकीस आली आहे . सदर तरुणीवर अत्याचार झाल्याची ही चर्चा परिसरात आहे.. आज सकाळी कुंभारटोली गावातील काही लोक जंगल परिसरात सरपण वेचण्या करीता गेले असताना गावकर्यांना मुलीचे मृतदेह दिसताच याची माहिती आमगाव पोलिसांना दिली असून . पोलिसांनी घटना स्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदना करिता ग्रामीण रुग्णायात पाठविले असून ही घटना काल रात्री घडली असून काही अज्ञान इसमांनी ह्या तरुणीवर अत्याचार करीत तोंडावर कापड टाकून जाळण्याचा प्रयत्न करीत पढ काढले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत…
नागपूर : नवजात बाळ विक्री प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असून अवघ्या महिनाभर वयाच्या मुलीची विक्री केल्यानंतर त्यातून आलेल्या पैशातून पित्याने नवीन दुचाकी, कुलर, मोबाईल, दिवान आणि ढीगभर नवीन कपडय़ांसह अन्य चैनीच्या वस्तूंची खरेदी केल्याची माहिती उघड झाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूमेश्वरी ऊर्फ ईश्वरी (२५) हिचे लग्न वडसा येथे झाले होते. पहिल्या पतीकडून तिला पाच वर्षांची मुलगी आहे. पहिल्या पतीने तिला सोडल्यानंतर तिने उत्कर्ष दहिवले (पवनी-भंडारा) याच्याशी दुसरे लग्न केले. मोलमजुरी करणारा उत्कर्ष हा पत्नी, पाच वर्षांच्या मुलीसह राणी दुर्गावती चौकात राहत होता. दरम्यान, ईश्वरीला महिन्याभरापूर्वीच बाळ झाले. मात्र, दुसऱ्यांदा मुलगी झाल्यामुळे दारूडा उत्कर्ष निराश झाला. त्याला अनाथाश्रमातील कर्मचारी उषा…
आरोपींची संख्या पोहचली आता आठवर : २२ एप्रिलपर्यंत सुनावली पोलिस कोठडी भंडारा : आमगाव येथे सम्मेश मेश्राम याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी फरार सात आरोपींना कारधा पोलिसांनी अटक केली असून यात आरोपींची संख्या आता आठवर पोहचली आहे.आशिष मनोहर उके (३८), सोनु मनोहर उके (२८), दिनेश मनोहर उके (३४), गौरव उर्फ रोहन नरेंद्र उके (२३), मयुर पद्माकर नंदागवळी (२८), विदेश चंद्रशेखर मेश्राम (२९), देवेंद्र भिमराव मेश्राम (२६) सर्व रा. आमगाव (दिघोरी) यांचा समावेश आहे. आमगाव (दिघोरी) येथे रविवारला सायंकाळी सम्मेश मेश्राम याची गुप्ती, कटर, लोखंडी रॉडने हल्ला करून निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार…
अपघातात काकुचा मृत्यू,पुतण्या गंभीर उमरेड-भिवापुर महामार्गावरिल घटना नागपूर येथे शिकणा-या मुलीची भेट घेत रात्रीचे सुमारास खाजगी चारचाकी वाहनाने पुतण्यासह स्वगावी परतत असतांना झालेल्या अपघातात काकुचा जागीच मृत्यू तर पुतण्या गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली. सदर अपघात गत 17 एप्रिल रोजी रात्री 10 वाजताचे सुमारास उमरेड-भिवापुर राज्यमहामार्गावर घडली. या घटनेत बारव्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ अस्मिता अशोक नंदेश्वर (57) नामक काकुचा जागीच मृत्यू तर सुमीत दौलत नंदेश्वर (32) रा. बारव्हा नामक पुतण्या गंभीर रित्या जखमी झाला आहे. प्राप्त माहिती नुसार, घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास घटनेतील मृतक डॉक्टर काकू व जखमी वाहन चालक पुतण्या मालकी बेलेनो गाडी क्र. एम…
एका दिवसांत 15 हजार 185 कर्मचारी हजर ST Workers Strike : एसटी महामंडळातील कर्मचारी कामावर परतण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी एका दिवसांत एसटी महामंडळातील 15 हजार 185 कर्मचारी हजर असल्याची माहिती मिळत आहे.ऑक्टोबर, 2021 च्या शेवटच्या आठवड्यापासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. एसटी महामंडळाच्या सर्व कर्मचार्यांचे राज्य शासनात विलगीकरण करण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला होता. पुढील चार दिवसांत एसटी पूर्ण क्षमतेने सुरू होईल एसटी महामंडळातील कर्मचारी कामावर परतण्यास सुरुवात झाली आहे. पुढील चार दिवसांत एसटी पूर्ण क्षमतेने सुरू होईल असा एसटी प्रशासनाला विश्वास आहे. तर नव्याने हजर होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना एक दिवसाचे जुजबी प्रशिक्षण देण्यात येणारं…
माैदा (नागपूर) : अनाेळखी चाैघांनी ट्रकच्या केबिनमध्ये प्रवेश करीत चालकास मारहाण केली आणि त्याचे हातपाय बांधून ट्रक व त्यातील साहित्य चाेरून नेले. यात चाेरट्यांनी एकूण १३ लाख १२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला, अशी माहिती ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांनी दिली.ही घटना माेदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (दि. १६) मध्यरात्री १.१५ वाजताच्या सुमारास घडली. ट्रकचालक अक्षय वामनराव शिनपुरे (वय २६, रा. रामेश्वरी, नागपूर) हा एमएच-४०/व्हीएल-७३५० क्रमांकाच्या ट्रकमध्ये ५.५ टन रसायन आणि ३.५ टन इतर साहित्य घेऊन नागपूरहून अंबिकापूर (छत्तीसगड) येथे जाण्यासाठी निघाला हाेता. त्याने नागपूर-भंडारा महामार्गावरील महालगाव (ता. कामठी) शिवारात राेडलगत ट्रक थांबविला आणि टायर चेक करून…
भंडारा : जिल्ह्याच्या नजरा लागून असलेल्या बहुप्रतीक्षित पंचायत समिती पदाचे आरक्षण येत्या शुक्रवारी सभापती पदाचे आरक्षण सोडत जाहीर होत आहे या आरक्षण सोडतीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नजरा असून सत्ता स्थापनेचा मर्ग मोकळा होणार आहे. या सोडती नंतर खऱ्या अर्थाने मागील अडीच महिन्या पासून शांत असलेले राजकीय वातावरण आता ढवळून निघणार आहे. किंबहुना सभापतीपद आपल्याच पक्षात राहावे यासाठी घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सभापतीपदाचे आरक्षण कोणासाठी व कोणत्या पक्षासाठी लाभदायक ठरेल हे शुक्रवारी निश्चित होईल. जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाकरिता अडीच वर्षाच्या कालावधीसाठी आरक्षित पदाची सोडत 22 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन सभागृहात होणार आहे. तरी या सोडतीसाठी…
बीस्ट बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 5: विजयचा बीस्ट येत्या काही दिवसांत KGF 2 विरुद्ध कसा मैदानात उतरेल हे पाहणे बाकी आहे, ज्याला तमिळनाडूमध्ये देखील मागणी वाढत आहे. तामिळ सुपरस्टार विजयच्या अलीकडील चित्रपट बीस्टचा बॉक्स ऑफिस परफॉर्मन्स सोशल मीडियावर वादग्रस्त चर्चेचा बनला आहे. यशच्या KGF: Chapter 2 मधील नकारात्मक पुनरावलोकने आणि जोरदार स्पर्धेमुळे हा चित्रपट तिकीट खिडक्यांवर आपत्ती ठरला आहे असा लोकांचा एक भाग दावा करत असताना, दुसरा विभाग चित्रपटाच्या व्यावसायिक यशाचा उत्कटतेने बचाव करत आहे. ट्विटरवरील थिएटर मालक वाईट पुनरावलोकने असूनही, खचाखच भरलेल्या हाऊसमध्ये चित्रपट चालवल्याबद्दल बातम्या पसरवण्यासाठी बीस्टच्या बॉक्स ऑफिस नंबरचे शो-बाय-शो अपडेट ट्विट करत आहेत. “#BeastInRamCinemas हाऊसफुल रॅम्पेज…
नवी दिल्ली: दीर्घ विकेंडनंतर जागतिक बाजारपेठेसह देशांतर्गत समभाग सोमवारी सकाळी कमजोर नोटांवर उघडले. गेल्या आठवड्यात एचडीएफसी बँक आणि इन्फोसिसचे तिमाही निकाल बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमी पडले, त्यामुळे गुंतवणूकदारांच्या विश्वासाला धक्का बसला. सेन्सेक्सच्या घसरणीत त्यांच्या दोन समभागांनी 500 अंकांपेक्षा जास्त योगदान दिले. निफ्टी50 वेटेजमध्ये त्यांचा वाटा जवळपास 18 टक्के आहे. मार्च तिमाहीत कोविड कर्बमुळे दुखावलेल्या चिनी जीडीपी वाढीचा आकडा ४.८ टक्क्यांवर आल्यानंतर आशियाई बाजारपेठाही कमकुवत होत्या. दुसरीकडे, चीनच्या आर्थिक केंद्र शांघायमध्ये 2,417 पुष्टी झालेल्या स्थानिक पातळीवर कोविड प्रकरणे आणि 19,831 स्थानिक लक्षणे नसलेल्या वाहकांची नोंद झाली, ज्यामुळे जगातील कारखान्यांकडून सतत पुरवठ्याबद्दल चिंता निर्माण झाली. दुपारी 12.58 वाजता बीएसई सेन्सेक्स 1465 अंकांनी म्हणजेच…
दोन गुप्त्या, कटर आणि लोखंडी रॉड साहित्य घटनास्थळी आढळले भंडारा : जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी एका तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना कारधा पोलिस स्टेशन हद्दीतील आमगाव (दिघोरी) येथे रविवारला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. या थरारक हत्येनंतर आरोपींनी घटनास्थळी दोन गुप्त्या, एक कटर, लोखंडी रॉड टाकून पळ काढला. यात एका आरोपीने कारधा पोलिसांसमोर एका हत्यारासह आत्मसमर्पण केले.सम्मेश मनोज मेश्राम (३६) रा. आमगाव (टोली) असे मृतक तरुणाचे नाव आहे. तर, सचिन उके (२९) रा. आमगाव (टोली) असे आत्मसमर्पण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच कारधा ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत मिसाळे, सहाय्यक…
भंडारा: नागपूर येथे फिरायला जाऊ म्हणत धावत्या बसमध्ये विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली.याप्रकरणी राजेश ईश्वर मडावी ( वय १९ ) या युवकाला अटक करण्यात आली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, राजेश ईश्वर मडावी ( रा. बोदरा ता. साकोली ) याने अल्पवयीन विद्यार्थिनीला नागपूर येथे फिरायला जाऊ असे सांगितले. १२ एप्रिल रोजी सायंकाळी गोंदिया-नागपूर बसमध्ये ताे मुलीला घेऊन गेला. बसमध्ये ११ प्रवासी प्रवास करीत होते. बसमध्ये वाहक नसल्याचे पाहून राजेशने धावत्या बसमध्ये विद्यार्थिनीवर बलात्कार केला. नागपूरला पोहोचल्यानंतर राजेश विद्यार्थिनीला आपल्या नातेवाईकाकडे घेऊन गेला. त्या नातेवाईकाला राजेश आणि मुलीवर…
नवेगावबांध (गोंदिया) : नवेगावबांध ग्रामपंचायती अंतर्गत पंतप्रधान आवास योजना सन २०१९ – २०मध्ये श्री रामकृष्ण इस्तारी पुराम यांना घरकुल मंजूर करण्यात आले. परंतु त्यांचा १२ ऑगस्ट २०१३ रोजी मृत्यू झाला आहे.मग ग्रामपंचायत सचिव व सरपंच यांनी ग्रामसभा ठराव क्रमांक ११ नुसार २९ ऑगस्ट २०१६ रोजी तब्बल तीन वर्षानंतर ठराव घेऊन पंतप्रधान आवास योजनेत निवड करून लाभ दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या व्यक्तीचे जुने घर क्रमांक ८१७ वाॅर्ड क्रमांक २ मध्ये आहे. नवेगावबांध येथील उपसरपंचांच्या वॉर्डात आहे. मात्र, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलाचे बांधकाम न करताच सर्व निधीची उचल करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे सरपंचाच्या गावातील मृत व्यक्तीचे घर…
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या लोहखनिज प्रकल्पात कालच्या पहिल्या जाहीर कार्यक्रमानंतर नक्षली सक्रिय झाले आहे. आज एटापल्ली तालुक्यातील हेडरी पोलीस (Police) उपविभागीय क्षेत्रात नक्षल्यांनी हल्ला करुन दोघांची हत्या केली असल्याचे समोर आले आहे.दोघांची हत्या नक्षलवाद्यांनी (Naxalites) दगडाने डोके ठेचून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यातील हत्या झालेल्यापैकी एक व्यक्ती पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन हत्या करण्यात आली आहे. तर दुसरा व्यक्ती आत्मसमर्पित नक्षली आहे.काल गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या लोहखनिज प्रकल्पात पहिला जाहीर कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमाला अजुन बारा तासही उलटण्याआधीच नक्षल्यांनी (Naxalites) दोघांची हत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. Bhandara : झुंजीत जखमी…
उपचारासाठी गोरेवाडा केंद्रात हलविले भंडारा : दोन बिबट्यामध्ये झालेल्या झुंजीत एक एक बिबट गंभीर जखमी झाला. या बिबट्याचे रेस्क्यू करून पिंजऱ्यात बंद केले. औषधोपचार करण्यासाठी त्याला नागपूर येथील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरला हलविले आहे.ही घटना साकोली वन विभागाअंतर्गत येणाऱ्या शिरेगाव बांध परिक्षेत्रात घडली. नवेगाव बांध अभयारण्या लगत असलेल्या या घटनास्थळावर बिबट रस्त्यावरील पुलाखाली पाइपमध्ये असल्याची माहिती गोंदिया येथील आर आर यु पथकाला मिळाली. पथकाने घटनास्थळ गाठले. यावेळी सदर बिबट गंभीर जखमी असल्याची बाब समोर आली. याची माहिती आरआरयू पथकाने साकोलीचे सहाय्यक वनसंरक्षक रोशन राठोड यांना दिली. https://youtu.be/XT14HukuGLQ माहिती मिळताच राठोड हे आपल्या वन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. यावेळी राठोड यांनी गंभीर बिबट्याचे…
माकडे नगरातील घटना तुमसर – नाश्ता करीत असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी युवकाची धारदार शस्त्राने वार करीत हत्या केल्याची घटना आज दिनांक 12 एप्रिल ला सायंकाळी 5.30 च्या सुमारास माकडे नगरांमध्ये घडली मोदग्लायण ऊर्फ मोनू विनू गेडाम वय (27) राहणार आंबेडकर वार्ड तुमसर असे मृतक युवकाचे नाव असून मारेकरी फरार झाले. सविस्तर वृत्त असे की मृतक युवक हा व्यवसायाने टॅटू बनविणे व स्वतःची सलून चालवत होता आज सायंकाळी दुकान सुरू करण्यासाठी दुकाना जवळ आला आणि नाश्ता करण्यासाठी दुसऱ्या दुकानात गेला पण नाश्ता करता-करता ची अज्ञात हल्लेखोरांनी डोळ्यामध्ये मिरची पूड टाकून पाठीवर व मानेवर धारदार शस्त्राच्या वार केले कसातरी आपला जीव वाचवीत…
मानेगांव बाजार येथील घटना आरोपी कुटुंब अटकेत… भंडारा: धक्कादायक!! गाईला रस्त्यावर धुने एका कुटुंबाला चांगलेच महागात पड़ले असून गाईला धुतल्यानंतर आपल्या आवारात पाणी आल्याच्या क्षुल्लक कारणाने झालेल्या भांडणात शेजाऱ्यांने दुसऱ्या शेजाऱ्यांची लाकड़ी दांडयाने वार करत हत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलिस हद्दितिल मानेगांव बाजार येथे घडली आहे।ह्या प्रकरणी कारधा पोलिसात गुन्हा नोंद झाला असून आरोपी कुटुंबाला अटक करण्यात आली आहे। प्रेमसंबंधातून 21 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या… सोमलवाड़ा येथील घटना मानेगांव बाजार येथील मते आणि बोंदरे कुटुंब शेजारी राहत असून त्याचे सुरुवाती पासून क्षुल्लक कारणामुळे वाद असून होता।काल संध्याकाळी महादेव बोंदरे हे आपल्या गाईला घरासमोरिल रस्त्यावर धुत होते।दरम्यान गाय…
श्री क्लिनीकल लेबॉरेटोरीतील मशिनरीसह चार लाखाचा मुद्देमाल… जप्त पॅरावैद्यक कायद्यांतर्गत राज्यातील दुसऱ्या गुन्ह्याची नोंद वैद्यक प्रयोगशाळा चालविण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही परवानगी नसताना गोंदिया जिल्हाच्या देवरी शहरातील मध्यभागी बिनधास्त सुरू असलेल्या श्री क्लिनिकल लॅबोरेटोरीवर काल सायंकाळी देवरी पोलिसांनी कार्यवाही करीत सुमारे 3 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सदर प्रयोगशाळा संचालकाच्या विरुद्ध महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषद 2011 च्या कलम 31 व 32 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या कार्यवाहीमुळे गोंंदिया जिल्ह्यात बेकायदेशीर प्रयोगशाळा चालविणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. उल्लेखनीय म्हणजे पॅरावैद्यक कायद्यांतर्गत नोंदविलेला हा गुन्हा महाराष्ट्र राज्यातील दुसरा गुन्हा देवरीत दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. देवरी शहराच्या मध्यभागी असलेल्या…
भंडारा जिल्ह्याच्या साकोलीतील प्रकरण.. भंडारा न्यूज़भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील एका पोलीस पाटलाने घराशेजारी राहणाऱ्या एका 13 वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली। संजय रामकृष्ण रामटेके वय 35 वर्ष असे या नराधम पोलीस पाटलाचे नाव आहे।घटनेची तक्रार साकोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून साकोली पोलिसांनी पोलिस पाटलाविरोधात गुन्हा नोंद केला आहे। साकोली तालुक्यातील एका गावात रात्री बचत गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकी दरम्यान एका 13 वर्षीय बालिकेला पोलीस पाटलाकडून स्टॅम्प आणण्यासाठी पाठविले होते।मात्र, डाव पाहून व बालिका एकटीच घरी असल्याचे पाहून पोलीस पाटलाने विनयभंग केला, दुसऱ्या दिवशी सकाळी बालिकेने सर्व घडलेला प्रकार आपल्या सांगितला।लागलीच आई-वडिलांनी साकोली…
मुनवर फारुकीने कंगना राणौतच्या शोमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. वर्षानुवर्षे लग्न होऊन मूल झाल्याचा खुलासा त्याने केला. लहान वयातच लग्न झाल्याचे त्याने शेअर केले. कंगना राणौतने होस्ट केलेला रिअॅलिटी शो लॉक अप त्याच्या वादग्रस्त स्पर्धकांमुळे प्रेक्षकांचे खूप लक्ष वेधून घेत आहे. शोमधील सर्वात लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक असलेल्या मुनवर फारुकीकडे महिला चाहत्यांचे लक्ष वेधले जात आहे. मात्र अलीकडेच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक खुलासे झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. जजमेंट डे एपिसोडमध्ये कंगनाने मुनावरच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक अस्पष्ट चित्र स्क्रीनवर दाखवले. चित्र प्रदर्शित झाल्यानंतर, तिने त्याला याबद्दल बोलण्यास सांगितले. मात्र, मुनावरने नकार देत या प्रकरणाशी संबंधित काहीही चर्चा…
भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील सोमलवाडा येथील 21 वर्षीय युवकाने स्वताच्या शेतात रस्सीच्या सहाय्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. क्रिष्णा शालिक अतकरी (21) रा.सोमलवाड़ा असे मृतकाचे नाव आहे. मृतक क्रिष्णा याचे त्याच्या गावातील अल्पवयीन मुली बरोबर प्रेम संबंध जुळले होते. याची माहिती मुलीच्या आईला होताचमुलीच्या आईने क्रिष्णासोबत भांडण केले आता आपली बदनामी गावभर होणार असल्याची भीती बाळगून क्रिष्णा यांनी स्वतःच्या शेतात जाऊन झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या आधी सुद्धा मृतकाने दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. काल भांडण होताच रात्रभर घरी परत न आल्याने घरच्या लोकांनी सोधासोध केली मात्र क्रिष्णा दिसला नाही मात्र आज…
लाखांदूर तालुक्यातील प्रकार : भारनियमनामुळे सिंचन करताना अडचणी भंडारा : ४० अंश सेल्सिअस पेक्षा अधिकचे तापमान, त्यात भारनियमन असल्याने शेतातील पिकांना सिंचनाची व्यवस्था करण्यात निर्माण होणारी अडचण. यामुळे उभे धान पीक करपू लागल्याने उद्विग्ध शेतकऱ्याने सरकार आणि वीज वितरण कंपनीचा निषेध करण्यासाठी चक्क तीन एकर शेतातील उभ्या धानावर ट्रॅक्टर चालवून धान जमीनदोस्त केले. लाखांदूर तालुक्यातील पाऊनगाव येथे हा प्रकार घडला आहे. शेतकरी छत्रपती कोरे या शेतऱ्याने त्यांच्या शेतातील धान पिकात ट्रॅक्टर चालवून ते जमीनदोस्त केले. छत्रपती कोरे यांनी तीन एकरात उन्हाळी धानपिक लावले. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून आर्थिक तजवीज करता येईल, अशी अपेक्षा त्यांनी बाळगली होती. त्यादृष्टीने…
वर्धा (Wardha) जिल्ह्यामध्ये देवळी तील नागझरीत पशुवैद्यकीय दवाखान्यात काम करणार्या किसन ढगे या 29 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही आत्महत्या या तरूणाने एमपीएससी परीक्षेमध्ये (MPSC Exam) आलेल्या अपयशातून केल्याचं समोर आले आहे. किसनने एक सुसाईड नोट लिहली असून त्यामध्ये आईवडिलांनी शेती विकून शिक्षणावर खर्च केला पण नोकरी मिळत नसल्याने निराशेने आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. किसन ढगे हा नागझरीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात मागील 7 वर्षांपासून शिपाई पदावर काम करत आहे. देवळीत भाड्याने राहून तो एमपीएससीची परीक्षा देत होता. मोठ्या पदावर जाऊन काम करण्याच्या त्याच्या स्वप्नामध्ये त्याच्या सध्याच्या कामाच्या ठिकाणी असलेले सुपरवायझर देखील मदत करत होते पण…
भारतातील अनेक प्रांतापैकी महाराष्ट्र हे अत्यंत प्रगत, महापुरूषाचे आणि संताची भूमी असलेले राज्य म्हणून ओळखले जाते. या भूमीत जन्माला आलेले महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, र.धो.कर्वे, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या महापुरूषांच्या कर्तृत्वाने बहरलेली ही भूमी आहे. या भूमीत कर्मवीरांसारख्या महापुरूषांने शिक्षणाचा केलेला प्रसार केला.जातीभेदाच्या पलिकडे जात यारे यारे सान थोर अवघ्या जातीचे नारीनर असे म्हणत संतानी समतेचा विचार प्रतिपादन केला. या सार्या विचाराची कास धरत त्या पाऊलवाटेने मार्गक्रमण करणारे राज्य म्हणून महाराष्ट्राचा परिचय आहे. या भूमीतून समतेचा विचार रूजविण्याचा प्रयत्न झाला. यशवंतराव चव्हाणांनी राजकारणाची वाट अत्यंत नैतिकतेच्या उंचीने घेऊन जाण्याचा सातत्याने प्रयत्न केला. महाराष्ट्र काल परवापर्यंत इतर…
युवती रामटेकची असल्याची ओळख पटली चंद्रपूर : भद्रावती येथे मुंडकं नसलेला आणि नग्नावस्थेत आढळलेल्या मुलीच्या मृतदेहाची ओळख पटली. स्थानिक गुन्हे शाखेच्या (Crime Branch) पथकाला मोठं यश आलंय. मृतक मुलगी नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक येथील रहिवासी आहे. गुडिया ( नाव बदललेलं. वय 22 वर्षे) असं मुलीचं नाव आहे. मयत मुलगी परिवारापासून वेगळी राहत असल्यामुळे तिच्या मिसिंगची कुठेही तक्रार नव्हती. मात्र पोलिसांनी खबरींच्या माध्यमातून मुलीची ओळख पटवली. मात्र मुलीच्या खुनाचे आरोपी, ठिकाण आणि उद्देश्याबाबत अजूनही खुलासा नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात (Bhadravati City) एका निर्घृण हत्येने खळबळ उडाली होती. नग्नावस्थेत असलेले डोकं छाटलेले एका युवतीचा मृतदेह सापडला होता. भद्रावतीच्या ITI मागील भागात ही घटना उघडकीस…
मुंबई : मुंबईत शनिवारी कोरोना व्हायरसच्या XE प्रकाराच्या व्हेरिएंटची (Corona XE Variant) लागण झालेल्या रूग्णांची पुष्टी झाल्याची नोंद झाली आहे, अशी माहिती, बीएमसीने (BMC) दिली आहे.सांताक्रूझ (SantaCruz) उपनगरातील रहिवासी असलेल्या 67 वर्षीय आणि पूर्ण लसीकरण झालेल्या पुरुषाला याची लागण झाल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, आढळून आलेला व्हेरिएंट यापूर्वी आढळून आलेल्या ओमिक्रॉनपेक्षा (Omicron) 10 पट जास्त संक्रमणक्षम असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे. (XE variant Of Coronavirus Confirmed In Mumbai)बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, XE व्हेरिएंटची लागण झालेली व्यक्ती 11 मार्च रोजी वडोदरा (Vadodara) येथे गेली होती. त्यावेळी एका हॉटेलमधील वास्तव्यादरम्यान संबंधित व्यक्तीची प्रकृती खालावली. त्यानंतर त्याची कोरोना टेस्ट (Corona Test) केली असता…
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघ यांकडून ६४वी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धा साताऱ्यातील शाहू क्रीडा संकुलात पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताब लढतीत कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विजयी झाला. पृथ्वीराजने विशाल बनकरचा ५-४ असा पराभव केला. ( Prithviraj Patil Won Maharashtra Kesari ) दिनांक ५ एप्रिल सुरु झालेल्या या स्पर्धेत संबंधित विभागात भल्या भल्या पैलवानांना पराभवाचे पाणी पाजत विशाल बनकर आणि पृथ्वीराज पाटील किताबी लढतीसाठी समोरासमोर उभे ठाकले होते. अंतिम किताबी लढत कशी होणार, दोन्ही तुल्यबळ प्रतिस्पर्धी मल्ल एकमेकांना कसे झुंज देणार आणि कोण होणार नवा महाराष्ट्र केसरी, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले…
गडचिरोली : प्रेयसीची हत्या करणारा (Girlfriend Murder) प्रियकर अखेर गजाआड झाला आहे. अल्पवयीन मुलीची हत्या करुन प्रियकराने तिचा मृतदेह जमिनीत पुरला होता. गडचिरोली जिल्ह्यात (Gadchiroli Crime) हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. संबंधित युवती चार दिवसांपासून बेपत्ता होती. मात्र तिचा खून करुन मृतदेह जमिनीत पुरल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपी प्रियकर (Boyfriend) हा माजी सरपंचाचा मुलगा आहे. मोबाईल लोकेशनवरुन तपास करत पोलिसांनी आरोपी अविनाश मडावी याला तेलंगणात बेड्या ठोकल्या आहेत. मयत अल्पवयीवन मुलीसोबत अविनाशचे प्रेमसंबंध होते, मात्र त्याने नेमक्या कुठल्या कारणावरुन ही हत्या केली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. काय आहे प्रकरण? अल्पवयीन युवतीची हत्या करुन मृतदेह जमिनीत पुरणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी…
भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवास्थानावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने भंडारा येथे आज दि.९ एप्रिल रोजी निषेध नोंदवित हल्लेखोरा वर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.सिल्व्हर ओक वरील हल्ल्यातील मुख्य सूत्रधार अँड.गुणवंत सदावर्ते आणि १२५ आंदोलकांवर कठोर शिक्षा करण्यात यावी, महाराष्ट्राचे लोकनेते असलेल्या शरद पवार यांच्या घरावर अशा प्रकारे दगडफेक /चपलाफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य असून, काही राजकीय शक्तीनं कडून जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फ यावेळी करण्यात आला. राज्यात राजकीय वातावरण खराब करण्यासाठी…
केंद्रीय सूचना व प्रसारण तथा क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेत खासदार सुनील मेंढे यांनी एक निवेदनही मंत्री महोदयांना देण्यात दिले. खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन भंडारा – गोंदिया जिल्ह्यात करण्यात आले होते. याची माहिती देणारी पुस्तिका भेटी दरम्यान मंत्री मा.अनुराग ठाकूरजी यांना खासदार सुनील मेंढे यांनी दिली. या पुस्तकाचे अवलोकन करून मंत्रीमहोदयांनी आयोजनाचे कौतुक केले. भविष्यात असे आयोजनात सहभागी होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान खासदारांनी त्यांना पुढील क्रीडा महोत्सवात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले.यावेळी खासदारांसोबत मुंबई येथील चित्रपट उद्योगातील दिग्गज व ऑस्कर अकादमीचे सदस्य उज्ज्वल निरगुडकर उपस्थित होते. त्यांनी मंत्री महोदया समोर भारतीय उद्योगासाठी ऑस्कर पुरस्कार आणि तांत्रिक गोष्टींना प्रोत्साहन…
आईला शिव्या दिल्या म्हणून मुलाने लाकड़ी दांडयाने वार करत वडिलांचा खून केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील खराशी येथे घड़ली आहे. बाबुराव काहालकर वय 68 वर्षे असे मृतकाचे नाव असून मंगेश काहालकर वय 28 वर्ष असे आरोपी मुलाचे नाव आहे. ह्या प्रकरणी पालांदुर पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा नोंद करुन अटक केली आहे. आरोपी मंगेश हा आपल्या आई वडिलांसह राहत असून वडिलाचे दारूच्या नशेत मुलासोबत अनेकदा वाद व्हायचा. घटनेच्या दिवशी असेच मृतक बाबूराव याचे आपल्या पत्नी शी जोरदार भांडण झाले. यात वडिल आईला शिव्यादेत असल्याने रागाच्या भरात मंगेशने आपल्या वडिलांना लाकडी दांडयाने मारहाण केली. यात वडिल गंभीर जखमी झाल्याने त्याच्या जागेवर…
प्रतिनिधी/भंडारा: भंडारा विधानसभा मतदार संघाचे कर्तबगार आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून भंडारा नगर पालिकेचे 2 नगर सेवक शिवसेनेत सहभागी झालेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा बंगल्यावर पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला.भंडारा नगर पालिकेत 5 वर्षापूर्वी प्रभाग 14 मधून भाजपाच्या तिकीटावर निवडून आलेले नगरसेवक नितीन धकाते व प्रभाग 15 मधून अपक्ष निवडून आलेले व भाजपच्या समर्थनावर उपाध्यक्ष राहिलेले दिनेश (छोटू) भूरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी दोन्ही नगरसेवकांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा आशिर्वाद घेतला. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात जिल्हा प्रमुख अनिल…
भंडारा : घराला कुलूप लावून सासरी जाणे एक व्यक्तीला चांगलेच महागात पडले असून घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरट्याने घरातून दीड लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी शहरातील येथील तिलक वॉर्डात उघडकीस आली आहे। मोहाडी येथील टिळक वॉर्डात राहुल रामप्रसाद धारगावे वय 41 हे घराला कुलूप लावून काही कामानिमित्त तुमसर येथे सासुरवाडीला गेले।सायंकाळी परत आले असता घराच्या समोरील दाराचे कुलूप तुटलेले दिसले।आत जाऊन बघितले तेव्हा बेडरूममधील कपाटातून दागिने चोरीस गेल्याचे लक्षात असून चोरट्यांनी सोन्याचे पदक, झुमके, नथ, तीन अंगठ्या व इतर दागिन्यांसह कपाटातील आठ हजार रुपये रोख असे तब्बल दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता।या…
राज्य महामार्गावरील घटनालाखांदुर :-वडसा ते लाखांदूर राज्य महामार्गावरून वडसा वरून लाखांदूर कडे येत असताना तालुक्यातील सोनी गावाजवळ बर्निंग बाईक थरार पाहावयास मिळाला. सदर घटना सहा एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील सोनी येथे घडली. या घटनेत जिवीतहानी झाली नसुन कैलास विठोबा चौधरी (३०) रा. पाऊणगाव असे दुचाकीचालकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील पाऊनगाव येथील कैलास चौधरी यांनी गत सहा महिन्यापूर्वी इलेक्ट्रिक दुचाकी विकत घेतली होती. घटनेच्या दिवशी कैलास इलेक्ट्रिक दुचाकीने तालुक्यातील पाऊनगाव येथून काही खाजगी कामानिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे गेला होता.दरम्यान, वडसा येथून कामकाज आटोपून सायंकाळच्या सुमारास ईलेक्ट्रीक दुचाकीने घरी परतत असताना वडसा ते लाखांदूर राज्य महामार्गावरील…
भंडारा : शेतशिवारात उभारण्यात आलेलले अख्खे टीनशेड चोरट्यांनी चोरले. त्याची परस्पर विक्री केली. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी टीनशेड चोरणाऱ्या दोन सख्ख्या भावांसह चौघांना अटक केली. न्यायालयाने चौघांनाही पोलिस कोठडीत सुनावली आहे.भिमराज उर्फ गोलू नेमिचंद मेश्राम (२४), धर्मराज उर्फ सोनू नेमिचंद मेश्राम (२३) दोघेही रा. सेलोटी ता. लाखनी, संतोष फुलचंद शाहू (३५), कार्तिक प्रकाश खेडीकर (२५) दोघेही रा. मानेगाव (सडक) ता. लाखनी या चौघांना लाखनी पोलिसांनी टीनशेड चोरी प्रकरणात अटक केली आहे. तर, लाखनी येथील लाखोरी मार्गावरील कबाडी व्यवसायिक प्रकाश भिवाजी मुंघाटे (६१) याला कबाडी घेतल्याप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि सूचनापत्रावर सोडले. लाखनी तालुक्यातील सालेभाटा शेतशिवारात स्टील रीरोलिंग कंपनीने टीनशेड उभारले आहे.…
दोघांना अटक : विनयभंग आणि पॉक्सो अंतर्गत कारवाई भंडारा : शाळा सुटल्यानंतर ऑटोची वाट बघणाऱ्या अल्पवयीन मुलीला एकाने तिला भुलथाप देत बळजबरीने दुचाकीवर बसवून पळवून नेले. ही बाब मुलीच्या वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी पाठलाग करून मुलीला पळविणाऱ्या युवकाला वाटेत पकडले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अनिकेत किशोर शहारे (२०) आणि सूरज जिवतोडे (२२) दोघेही रा. रेंगेपार (कोहळी) ता. लाखनी असेल पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत कारवाई करून अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. पीडित अल्पवयीन मुलगी ही १५ वर्षाची असून ती लाखनी तालुक्यातील पिंपळगाव (सडक) येथील आहे. शिक्षणासाठी ती दररोज लाखनी येथे शिकायला येते. गावातून ती…
▪ लाखांदूर तालुक्यातील इंदोरा जंगल परिसरातील घटना▪ तालुक्यातील दुसरी घटना लाखादूर : सकाळच्या सुमारास जंगलात मोहफुल वेचण्यासाठी गेलेल्या एका इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली. सदर घटना गत ५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास तालुक्यातील इंदोरा ते अरुणनगर मार्गावरील जंगल परिसरात उघडकीस आली आहे. जयपाल घोगलु कुंभरे (४०) रा इंदोरा असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. वाघाच्या हल्ल्यात इसम ठार होण्याची ही लाखांदूर तालुक्यातील दुसरी घटना आहे. प्राप्त माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास घटनेतील मृतक इंदोरा – अरुणनगर मार्गावरील जंगल परिसरात मोहफुल वेचण्यासाठी गेला होता. दरम्यान, जंगलातील एका झाडाखालील मोहफुले गोळा करून जंगलाबाहेर रस्त्यावर ठेवलेल्या…
लाँग मार्च मोर्चा : राष्ट्रीय महामार्गावर तिरडी सह चूल पेटविली भंडारा : दिवसागणिक वाढत चाललेली महागाई आणि यामुळे सर्वसामान्यांची होत असलेली कुचंबणा याला जबाबदार असलेल्या केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसने आज भंडाऱ्यात लाँग मार्च मोर्चा काढत निदर्शने केली. राष्ट्रीय महामार्गावरील त्रिमूर्ती चौकात काँग्रेसच्या महिलांनी चूल पेटवून त्यावर पोळ्या बनविल्या. तर युवक आणि काँग्रेस कमिटीने तिरडीवर ठेवलेले दुचाकी वाहन पेटवून दिले. मंगळवारला दुपारला करण्यात आलेल्या काँग्रेसच्या या आंदोलनामुळे पोलिसांची काहीकाळ त्रेधातिरपिट उडाली. पाच राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर यासह खाद्यपदार्थांची मोठी दरवाढ केली आहे. एक नव्हे तर, दररोजच ही दरवाढ होत असल्याने गोरगरीब जनतेची आर्थिक लूट…
सुसाईड नोट लिहून १३ वर्षीय मुलीची आत्महत्या नागपुर :- नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीने मृत्यू सुंदर असून मला त्याचाशी मैत्री करायची आहे असे लिहून ठेवत आत्महत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे.आठवीच्या वर्गातील आर्याने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले आहे. ‘मृत्यू किती सुंदर आहे, मृत्यूला कवटाळायला मला आवडेल.डेथ इज गोल्ड.मृत्यूशी मला मैत्री करायची आहे’ अशा प्रकराचे वाक्य लिहून तिने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना आज सोमवारी दुपारी उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्या हरिश्चंद्र मानकर असे मृत मुलीचे नाव आहे. हरिश्चंद्र मानकर हे व्हिएनआयटी महाविद्यालायात नोकरीवर आहेत. ते पत्नी, दोन मुली आणि एका मुलासह चंद्रमणीनगरात राहतात.…
लाखनी : ओलंपिया जिम आणि संमिश्र ग्रुप लाखनी यांच्या वतीने रात्रकालीन रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या आयोजनाचे हे सलग सहावे वर्ष असून महिला व पुरुष अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. महिलांचे देखील अनेक संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.पुरूष गटात संमिश्र ग्रुप लाखनी, हार्डकोअर ए भंडारा निर्वाण मोहल्ला लाखनी, जय श्रीराम चंद्रपूर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक प्राप्त केला. महिला गटामध्ये मराठा ग्रुप लाखनी यांनी प्रथम आणि ब्रास सिटी ग्रुप यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. अंतिम सामना बघण्यासाठी आणि बक्षीस वितरण करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले उपस्थित…
त्रिमूर्ती चौकात धरणे : जिल्ह्यातील ४०० कर्मचारी संपात सहभागी, कामकाज झाले प्रभावित भंडारा : मागील दोन वर्षांपासून महसूल विभागातील अव्वल कारकून मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गातील पदांची पदोन्नती मागील रखडलेली आहे. ती तातडीने पूर्ण करावी, यासह विविध मागण्यांना घेऊन महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आठवडाभरात पुन्हा दुसऱ्यांदा एक दिवसीय राज्यव्यापी आंदोलन केले. यात भंडारा जिल्ह्यातील लीपिकवर्गिय कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत आंदोलन केले. महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्याबाबत कर्मचारी संघटांनी शासनाला अनेकदा निवेदने दिली. मात्र, सरकारकडून या मागण्यांची अजूनही पूर्तता करण्यात आली नाही. किंबहुना त्या सोडविण्याचा प्रयत्नही अद्याप करण्यासाठी कोणी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे राज्यभरातील अव्वल कारकून व…
भंडारा : अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारकडून आमदारांना घरांचे वाटप करण्याची घोषणा करण्यात आली. यामुळे राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटले. एकीकडे ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली. तर, ओबीसींच्या घरकुलाचा प्रश्न अद्यापही ऐरणीवर आहे. अशा आमदारांना मोफत घर वाटप करण्यात येत असल्याने ओबीसी क्रांती मोर्चाने भंडाऱ्यात अभिनव आंदोलन करीत या घरांसाठी निधी कमी पडू नये म्हणून ‘भीक मांगो आंदोलन केले. पुढील आठ दिवस असे आंदोलन करून संकलित निधी राज्य सरकारला पाठविण्यात येणार आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात ३०० आमदारांना मुंबई येथील गोरेगाव येथील घरे बांधून देण्याची घोषणा केली. राज्यातील अनेकगोरगरिबांना घरी नसल्याने उघड्यावर राहावे लागत आहे. तर ओबीसी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांची सुरु…
राष्ट्रीय महामार्गावरील घटना : अज्ञात वाहनाच्या धडकेत घडली घटना भंडारा : भंडारा येथून साकोलीकडे जाणाऱ्या नणंद आणि वहिनीच्या दुचाकीला भरधाव वाहनाने जबर धडक दिली. या भीषण अपघातात जखमी झालेल्या दोघींचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील मोहघाटा जंगल परिसरात सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.सोनाली राहुल संगीडवार (२८) रा. आकापुर ता. मूल जि. चंद्रपूर असे वहिनीचे तर, सुरुची रवींद्र मल्लेलवार (२५) रा. खुटसावरी ता. लाखनी जि. भंडारा असे नणंदचे नाव आहे. सोनाली आणि सुरूची या दोघीही एम एच ३६ एच ४२३५ या मोपेडने साकोली तालुक्यातील गोंडउमरी येथे जात होत्या. मोहघाटा जंगलामध्ये रस्त्यालगत वृक्षांची कटाई सुरू असल्याने…
रानटी कुत्रे अथवा जंगली श्वापदांनी मारल्याचा अंदाजपाच ते सहा दिवसापूर्वीची घटना भंडरा:- उमरेड करहांडला व्याघ्र प्रकल्प पवनी वनपरिक्षेत्रात शॉडो नामक वाघिणीच्या एका ६ महिन्याच्या छाव्याचे शव कुजलेल्या अवस्थेत सापडले. पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या शॉडो वाघिणीला ३ शावक होते. शनिवारी २ एप्रिलला दोनच बछडे सफरीत दिसून आल्याने वन्यजीव विभागातर्फे शोध सुरू होता. सोमवार दि. ४ एप्रिलला सकाळी ९.३० च्या सुमारास एका बछड्याचे शव कुजलेल्या व अर्धवट वाळलेल्या अवस्थेत सापडले. मृत छाव्याच्या शरीरावर जखमेच्या खुणा असून ‘ढोले’ म्हणजेच रानटी कुत्रे किंवा दुसऱ्या एखाद्या हिंस्त्र श्वापदाने मारले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. घटनास्थळी पंचनामा करतेवेळी सीएफ श्रीमती श्रीलक्ष्मी अन्नपटूला, उमरेड-कहूंडला अभयारण्याचे उपवनसंरक्षक प्रमोद…
भंडारा ; पाच महिन्यापासून पगार मिळाला नसल्याने नैराश्येत गेलेल्या एका कंत्राटी रुग्णवाहिका चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (शुक्रवार) पवनी तालुक्यातील कोंढा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सदनिकेत उघडकीस आली. विक्की उर्फ विकास मुकुंदा मेश्राम (वय २२) असे मृत चालकाचे नाव असून तो मुळचा चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील पारडगाव येथील रहिवासी आहे. सध्या तो कोंढा प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी रुग्णवाहिका चालक म्हणून कार्यरत होता. https://www.crime24tass.com/mothi-batami-mhada-yojnet-polisansathi-10-takke-gharam-reserved-thackeray-government-announcement/ घटनेतील मृतक विक्की मेश्राम याला काही महिन्यापासून पगार मिळाला नव्हता. शिवाय ठेकेदाराकडून त्याला त्रास होत होता. या त्रासाला कंटाळून ३० मार्च रोजीच्या रात्री कोंढा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सदनिकेत विक्कीने पंख्याला दोरी बांधून गळफास…
जळगाव : उन्हा – तान्हात आणि कोरोना काळात अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलिसांसाठी म्हाडाच्या सर्व योजनांमध्ये दहा टक्के घरे आरक्षित केली जातील, अशी महत्वपूर्ण घोषणा राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी फैजपूर येथे केली. एका खाजगी कार्यक्रमासाठी आव्हाड हे शुक्रवारी फैजपूर (ता. यावल) येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, गृहनिर्माण विभागातर्फे तालुका तिथे म्हाडा योजना राबविण्यात येणार आहे. कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर पोलीस बांधवांचे मृत्यू झाले आहेत. अहोरात्र सेवा बजावणाऱ्या पोलीस बांधवांसाठी म्हाडाच्या योजनेत दहा टक्के आरक्षण ठेवण्यात येईल. तसेच पुणे (धानोरी) येथे ५२ एकर जमिन घेतली आहे. त्यात सुद्धा पोलिसांना पाच टक्के कोटा देण्यात येईल. अल्पसंख्यांक…
भंडारा: माहिती, प्रसारण आणि दूरसंचार मंत्रालयाच्या अनुषंगाने इंटरनेट सेवा, मोबाईल नेटवर्क आणि अनेक विषयांच्या दृष्टीने खासदार सुनील मेंढे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव उत्तर देत काही बाबींचा खुलासा केला आहे.संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान खासदार सुनील मेंढे यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून हा विषय लावून धरला. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागात मोबाईल इंटरनेटचा विस्तार किती प्रमाणात झाला आहे. भारत नेट योजनेची वर्तमान स्थिती आणि या योजनेत सहभागी झालेल्या लाभार्थ्यांची संख्या देण्यात यावी. महाराष्ट्र राज्यात शंभर टक्के इंटरनेट कव्हरेज केव्हापर्यंत मिळण्याची शक्यता आहे, पीएम वाणी योजनेची स्थिती काय? ग्रामीण भागातील अतिदुर्गम क्षेत्रात इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे का? नसेल…
भंडारा : बावनथळी प्रकल्पातून पाणी सोडण्यात येत आहे. नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील बावनथडीच्या नहरात एक वाघ मृतावस्थेत आढळून आला. ही घटना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यामुळे वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे.तुमसर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या बावनथडी प्रकल्पाच्या नहरात वाघ कदाचित पाणी पिण्यासाठी उतरला असावा. यातच त्याचा तोल जाऊन धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यात तो बुडाला. नहरातून सदर वाघाला वर येता न आल्याने त्यातच त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, बपेरा गावाजवळील नहरात वाघ मृतावस्थेत असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. यावरून बपेरासह उसर्रा आणि परिसरातील गावातील ग्रामस्थांनी मृतावस्थेत असलेल्या वाघाला बघण्यासाठी…
गोंदिया जिल्ह्यातील बिरसी विमानतळा अंतर्गत असलेल्या लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न येत्या महिनाभरात मार्गी लागेल चिन्हे दिसू लागली आहेत. खासदार सुनील मेंढे यांनी याच विषयाला घेऊन प्रमुख अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेत यासंदर्भात निर्देश दिले.बीरसी विमानतळ परिसरातील 106 लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला होता. या विषयाला घेऊन गावकऱ्यांनी आंदोलनाची भूमिकाही घेतली होती. त्या दरम्यान या लोकांचे पुनर्वसन होणे क्रम प्राप्त असल्याने हा विषय तत्काळ मार्गी लागावा या दृष्टीने आज पुन्हा एकदा खासदार सुनील मेंढे यांनी विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी व अन्य प्रमुख अधिकाऱ्यांना घेऊन महत्त्वाची बैठक घेतली. यावेळेस बैठकीत उपजिल्हाधिकारी मा.राजेश खवले, निवासी जिल्हाधिकारी मा.जयराम देशपांडे, मा.सुभाष चौधरी, जिल्हा भूमिअभिलेख अधिकारी मा.रोहिणी सागरे, तहसीलदार…
रमाबाई आंबेडकर वार्डातील अंगवाडीचे लोकार्पण भंडारा : सकस आहार आणि योग्य संस्कार झाले तर बालकांचा सर्वांगिण विकास होतो. हेच काम अंगणवाड्यांच्या माध्यामातून केले जात आहे. देशाची भावीपिढी सुदृढ आणि संस्कारक्षम करण्याचे कार्य अंगणवाडीच्या माध्यमातून होत असून केंद्र सरकार या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन खासदार सुनील मेंढे यांनी केले.नगर परिषद भंडारा प्रभाग क्र.10 येथे अंगणवाडी इमारत लोकार्पण व ई श्रम कार्डचे वाटप खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते पार पडले.नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष आशु गोंडाने यांच्या पुढाकाराने सूसज अंगवाडीचे लोकार्पण, आहार प्रदर्शनी व ई श्रम कार्ड वाटप होत आहे .अंगणवाडीच्या माध्यमातून आज विविध उपक्रम राबविले जातात. त्यात…
ओवरटेकच्या नादात दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या व्यक्तीला भरधाव येणाऱ्या ट्रकने चिरडले…कारधा पुलावरिल घटना..एकाचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी… भंडारा न्यूज़ ओव्हरटेकच्या नादात दुचाकीने ट्रिपल सीट जाणाऱ्या व्यक्तींना भरधाव येणाऱ्या टिप्परने चिरडल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या वैनगंगा नदीवर असलेल्या पुलावर घडली असून झालेल्या अपघातात एका महिलांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे।मृतकात 60 वर्षीय सुशीला कागदे समावेश असून 39 वर्षीय सुनिता कागदे व विष्णू कागदे वय 45 वर्ष हा गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर भंडारा सामान्य रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे। वैनगंगा पुलिया पर टेलर ने मारी बाइक को टक्कर दो की मौत एक घायल कामानिमित्त दुचाकी वरील लोक साकोली…
राज्याला निर्देश देऊन प्रस्ताव पाठविण्याची लोकसभेत खासदार सुनील मेंढेंची मागणी केंद्र सरकारने केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत 75 वैद्यकीय महाविद्यालयांना अनुमोदन दिले आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने अजून पर्यंत भंडारा जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्या संदर्भात सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केला नाही. या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारला निर्देश देऊन जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने कारवाई करावी अशी मागणी खासदार सुनील मेंढे यांनी आज लोकसभेत केली.सुरू असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आज खासदार सुनील मेंढे यांनी भंडारा जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न उपस्थित केला. भंडारा हे जुने शहर असून जिल्ह्याचे ठिकाण आहे. मात्र या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय नाही. उपचारासाठी येथील रुग्णांना नागपूर किंवा अन्य जिल्ह्यांमध्ये जावे…
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधानसभेत हजर होते. दोघांनीही आपल्या भाषणात विविध विषयांवर चर्चा केली. सध्या सुरू असलेल्या ईडीच्या कारवायांबद्दल उद्धव ठाकरे काय बोलतील याबाबत उत्सुकता होती पण त्यांनी महाविकास आघाडी सरकारने केलेली विकास कामे सांगितली. उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे – मुंबईचा विचार देशात सोन्याचं अंडं देणारी कोंबडी असा म्हणून केला गेला. पण मुंबई घडवणाऱ्या लोकांचा आतापर्यंत कधीच विचार झाला नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.मुंबईच्या विकासासाठी कामाला सुरुवात झाली आहे. अनेक योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत. पण काही योजना करणं आपल्या हातात नाही. उदा. धारावी पुनर्विकास धारावीचा विकास हा झालाच…
एक मोटरसायकल , 4 पेटी देशीदारु 72000 रूपयांचा मुद्देमाल जप्त अकोला :- बोरगाव ते मुर्तीजापूर रोड वर कारवाई मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकास मिळालेल्या ख़बरेवरुन बोरगांव मूर्तिजापुर रोडावर नाकाबन्दी केली असता मोटरसायकल होंडा शाईन नम्बर MH 30BG 7695 यावर आरोपी 1, संदीप दीपक गवई रा बोरगांव 2 मंगेश प्रकाश दामोदर हे बिनापरवाना देशीदारु च्या 4 पेटी ज्यात 244 नग बॉटल दारूचि कीमत 12,000 रुपये व मोटरसायकल 60000 रुपये असा 72000 रूपयांचा मुद्देमाल जपत करून वरील 2 अरोपिताविरुद्ध पो स्टे बोरगांव येथे दारुबन्दी कायदा कलम 65 ई प्रमाणे गुन्हा नोंदविन्यात आला आहेसदर कार्यवाहि मा पोलिस अधीक्षक…
भंडारा :- प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत नोंदणी केलेल्या मात्र लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांचा डाटा दुरुस्त करण्यासाठी विशेष मोहीम 25 मार्च रोजी राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह सुरु असलेल्या शिबिरात जाऊन दुरुस्ती करून घ्यावी असे आवाहन खासदार सुनील मेंढे यांनी केले आहे.25 मार्च रोजी राबविण्यात येत असून प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती मात्र त्यांना लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांचा डाटा दुरुस्त करण्याच्या अनुषंगाने गावपातळीवर शिबिर घेण्याचा निर्णय शासनाने घेतला. 25 मार्च रोजी कार्यालयीन वेळेत स्थानिक ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालयात हे शिबिर होणार आहे. शेतकऱ्यांनी आधार कार्ड, सातबारा आणि पासबुक प्रत घेऊन विशेष शिबिरात हजेरी…
प्रतिनिधी/भंडारा: ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेतांना प्रचंड आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील विद्यर्थ्यांना 100 टक्के शिष्यवृत्ती देण्यत यावी, अशी कळकळीची मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी विधानसभा अधिवेशन दरम्यान सभागृहात केली.सामाजिक न्याय विभागामार्फत उच्च शिक्षणाकरीता शिक्षण कर्ज दिले जाते. मागील 2 वर्षाच्या कोरोना परिस्थितीमुळे सर्व विद्यार्थ्यांचे मागील कर्ज माफ करून नवीन कर्जपूरवठा करण्यात यावा. कोरोनाच्या काळात आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांसोबतच आरोग्य शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांनी खूप मोठे योगदान दिले आहे. आज भंडारा जिल्ह्यात एम.बी.बी.एस., बी.ए.एम.एस. असे कोणतेही आरोग्य शिक्षण देणारी संस्था नाही. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात एम.बी.बी.एस., बी.ए.एम.एस. महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी सुध्दा आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली.राखीव…
नागपूर : वैनगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत उपाययोजना हाती घेण्याचे निर्देश पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. त्यानुसार सर्व शासकीय यंत्रणांनी लघु व दीर्घकालीन उपाययोजनांचा कृती आराखडा तातडीने सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला, भंडाराचे जिल्हाधिकारी संदीप कदम, नागपूर महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, उपायुक्त (गोसीखुर्द) आशा पठाण, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अशोक करे, उप प्रादेशिक अधिकारी आनंद काटोले यांच्यासह…
खडीगंमत महोत्सवाला उर्स्फुत प्रतिसाद भंडारा दि.23 विदर्भातील पुरातन लोकनाट्य खडीगंमत महोत्सवाला काल सायंकाळी दवडीपार बाजार येथे उर्स्फुत प्रतिसादात सुरूवात झाली.या महोत्सवाच्या उदघाटनाला सरपंच अश्विनीताई मडावी,उपसरपंच भागवत हजारे, पोलीस पाटील श्री.धुर्वे,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विश्वनाथ पडोळे यांच्यासह मान्यवर नागरिक उपस्थित होते.आजादी का अमृत महोत्सवांतर्गत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अभिनव संकल्पनेतून सांस्कृतिक कार्य संचालनालय, व शासनातर्फे राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम व महोत्सवांचे आयोजन करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 22 मार्च ते 26 मार्च खडीगंमत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. खडीगंमत हे विदर्भातील पुरातन लोकनाट्य असून पूर्व विदर्भात खडीगंमत ही लोककला आजही फार मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे.ग्रामीण भागातील रसिक प्रेक्षक…
फक्त ऑनलाईन नोंद करा, संधीचा लाभ घ्या भंडारा :- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त येत्या 27 ते 30 मार्च या तीन दिवसांच्या कालावधीत ऑनलाईन पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे त्याअनुषंगाने नामांकित कंपन्या आणि नियोक्तयांनी रिकत् पदांची नोंद कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता विभागाच्या http//www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर online job fair Bhandra-7येथुन आपल्या आवश्यकतेनुसार बेरोजगार उमेदवारांची उपलब्ध् असलेली यादी ऑनलाइन पध्दतीने प्राप्त् करावी.रोजगार मेळाव्यामध्येउच्च शिक्षित उमेदवारांपासून ते अशिक्षित उमेदवारांना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत. तरी उमेदवारांनी मोझिला फायर किंवा गुगल क्रोम या ब्राऊजरचा वापर करून या विभागाचे वेबपोर्टल http//www.rojgar.mahaswayam.gov.in ओपन करावे. नोकरीसाठी म्हणून आपल्या युजरनेम व पासवर्डवरून लॉगीन करावे उमेदवारांनी यापूर्वी…
भंडारा :- माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशानुसार तसेच माननीय श्रीमती अंजू शेंडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा व जिल्हा कारागृह, भंडारा यांच्या संयूक्त विद्यमाने दिनांक २३/०३/२०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता जिल्हा कारागृह, भंडारा येथे कैद्यांचे अधिकार यावर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचा आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्या श्रीमती नेहा गजभिये, पॅनल अधिवक्ता, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा यांनी मार्गदर्शन करतांना भारतीय संविधानाच्या कलम १४, १९ व २१ नुसार आरोपी कारागृहात असले तरी हे अधिकार जसेच्या तसे त्यांना लागू असतात. कलम…
प्रशासनाने व्यक्त केले समाधान भंडारा :- दि.23 जिल्हयात कोरोना संसर्गाची तिसरी लाट आता संपली असुन आज रोजी जिल्हयातील सातही तालुक्यात एकही कोविड पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद आढळुन आली नाही. जिल्हयात सध्या एकही ॲक्टिव्ह रुग्ण नसुन गुरुवारला जिल्हयात 355 ॲन्टीजेन तर 68 आरटीपीसीआर असे एकुण 423 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली त्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले नाही. आज तारखेपर्यंत जिल्हयातील सातही तालुक्यात एकही ॲक्टिव्ह रुग्ण नसल्यामुळे प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत 98 हजार 366 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यात 7 हजार 797 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळुन आले, त्यापैकी 7 हजार 789 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली असुन, 8…
विशेष पथक प्रमुख विलास पाटील यांच्या टीम ची मोठी कारवाई 2 लोखंडी रिव्होलवर सदृश्य शस्त्र व 10 लोखंडी तलवार चाकू शस्त्र जप्त प्रतिनिधी डॉ संजय चव्हाण अकोला :- दि,22,03,22 रोजी मा पोलिस अधिक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शना खालील विशेष पथकास मिलालेल्या ख़बरेवरुन की चानदेकर चौक मधील बैंक ऑफ इंडिया समोर काही इसम हे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना रिवालवार ,पिस्तौल व तलवारी चां धाक दाखवून जबरी चोरी दरोडा घालनयाच्या तयारित आहेत त्यांच्ये जवळ प्राणघातक शस्त्रे ही आहेत अशा खात्रिशिर ख़बरेवरुन पंचा समक्ष छापा मारला असता 4 सराइत गुन्हेगार घटनास्थली रंगेहाथ मिळून आले त्यांच्ये जवळून 2 अग्निशस्त्र सारखे पिस्तौल ,रिवालवर, लोखंडी कट्टे…
70,000 रूपयांचा मुद्देमाल जप्त अकोला जिल्हा प्रतिनिधी डॉ संजय चव्हाण अकोला:- अगर निंबा येथे दि, 21,03,22रोजी मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शना खालील विशेष पथकास मिळालेल्या ख़बरेवरुन आगर गावातील बाजारातील जुगार अडयावर छापा मारला असता आरोपी, 1, गणेश हिरामन गायकवाड़ 2 प्रभाकर रामभाऊ तायड़े, 3, संतोष मुरलीधर सावले 4, रविंद्र अप्पा बोहरी 5, मोहम्मद इमरान मोहम्मद उस्मान 6अनीस खान खाजा खान 7, करामत शाह कदीर शाह 8, भिमराव केरुजी शिरसात सर्व रा आगर यांच्या जवळून जुगाराचे नगदी 16,800 रुपये, मोबाइल 3 कीमत 30,000 रुपये असा 46800 रूपयांचा मुद्देमाल जपत करण्यात आला अरोपि 9, धनदयाचा जुगाराचा मालक प्रभुदास बोर्डे…
भंडारा:- जिल्ह्यातील अड्याळ पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कलेवाडा शेतशिवारात शेकऱ्याचा मृतदेह आढळला. या शेतकऱ्याच्या डोक्यावर आणि गुप्तांगात जखम आढळून आल्याने खून केला असल्याचा संशय केला जात आहे. सविस्तर असे की शनिवारी फिर्यादी ज्ञानदीप टेंभुरणे चे वडील मृतक नामे प्रदीप मंगल टेंभुर्णे वय (45) वर्ष रा. कलेवाडा हे नेहमी प्रमाणे आपले गावाचे बाहेर असलेले शेतावर मालाची जागली करण्यासाठी मचानावर गेले होते. परंतु ते आज रविवार सकाळी लवकर परत न आल्याने फिर्यादी यांनी त्यांचे शेतावर जाऊन बघितले असता मृतकाचे डोक्यावर व गुप्त अंगावर जखमा झालेल्या दिसल्या व रक्त आलेले दिसले म्हणून त्यास फिर्यादीने हलवून बघितले असता त्यांचे वडिलांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली…
भंडारा : ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित खासदार क्रीडा महोत्सवात भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील तब्बल पाच हजारावर खेळाडूंनी सहभाग नोंदविला. क्रिकेट, कबड्डी, शंकरपट, नौकानयन, कुस्ती या स्पर्धा घेण्यात आल्या. आयोजक खासदार सुनील मेंढे कबड्डीच्या मैदानात प्रत्यक्ष उतरले आणि त्यांनी खेळाडूचा उत्साह वाढविला. त्यांनी जोशात केलेल्या चढायाचे सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत केले. भंडारा येथील रेल्वे मैदानावर 26 फेब्रुवारी ते 13 मार्चपर्यंत खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा.नितीनजी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. क्रिकेटच्या रणसंग्रामापासून ते ग्रामीण भागात लोकप्रिय शंकरपटापर्यंत सर्वच खेळांचा आनंद क्रीडाप्रेमींनी आणि खेळाडूंनी लुटला. या खासदार क्रीडा महोत्सवात 351 संघ तसेच…
लातूर : यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अनेकजण आपल्या आयुष्याची महत्वपूर्ण वर्ष देत असतात. मात्र त्यात अनेकांना अपयश देखील येत. मात्र या सगळ्यात लातूरच्या लेकीने नुकताच यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होत देशात आपला डंका वाजवला आहे.एवढंच नाही तर देशात सर्वात लहान आयपीएस बनण्याचा मान देखील या मुलीला मिळाला आहे. यूपीएससी परीक्षेचा नुकताच निकाल लागला. त्यामध्ये महाराष्ट्रातील 100 हून अधिक विद्यार्थी यशस्वी झाले. मूळच्या लातूरच्या असणाऱ्या नीतिशा जगतापने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीमध्ये यश संपादन केलं असून तिची 199 रॅन्क आहे. महत्वाचं म्हणजे नीतिशा जगताप ही केवळ 21 वर्षाची आहे. त्यामुळे तिचे हे यश कौतुकास्पद आहे. नीतिशा जगतापने पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून सायकॉलॉजी या विषयातून पदवी…
राज्यात 5297 पदांची पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच या पोलिसांना नेमणुका दिल्या जातील. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसांत पोलिसांच्या 7231 पदांची भरती केली जाईल, अशी खूशखबर पोलीस भरतीसाठी उत्सुक असलेल्या तरुणांसाठी गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज दिली.विरोधकांच्या कायदा सुव्यवस्थेवरील प्रश्नावर उत्तर देताना दिलीप वळसे-पाटील म्हणाले, महाराष्ट्र पोलीस दलातील 7231 कॉन्स्टेबल पदांची भरती येत्या काळात सुरू करण्यात येईल. पोलीस भरतीसाठी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या पदाची भरती करताना कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ दिले जाणार नाहीत. ही भरती पारदर्शक पद्धतीने केली जाईल. पोलीस दल सक्षम करण्यासाठी प्रयत्न पोलीस दल अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न आहेत. याअंतर्गत पोलीस…
पोलिसांनी हे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे एका प्रेमी युगुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे. सावनेरच्या माताखेडी परिसरात हे प्रेमी युगुल राहत होतं.प्रियकर आकाश लालबागेने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याचं कळताच त्याची प्रेयसी किरण काकडेनेही आपल्या घरी आत्महत्या केली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच नागपूरच्या कामठी भागात अल्पवयीन जोडप्याने धावत्या ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच सावनेरमध्ये अशाच प्रकारची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमप्रकरण आणि लग्नाला घरातून असणारा विरोध या कारणामुळे या जोडप्याने आपलं आयुष्य…
पुणे : पुण्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर वडगाव शेरी हद्दीत धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. एक तर्फी प्रेमातून ही घटना घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही खळबळजनक घटना वडगाव शेरी येथे घडली. आजूबाजूला असलेल्या लोकांनी तात्काळ या मुलीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर वडगाव शेरी येथील सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, दहावीच्या या विद्यार्थिनीवर २१ वर्षीय मुलाने शाळेच्या आवारातच चाकूहल्ला केला. विशेष म्हणजे मुलीवर वार केल्यानंतर आरोपीने विष प्राशन केले. सध्या दोघांनाही रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरु आहेत. पोलिसांना घटनेची माहिती मिळाली असून ते आवश्यक ती कार्यवाही…
नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहातील (Nagpur Central Jail) दोन कैद्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.बाबुराव पंच आणि नरेंद्र राजेश वाहने या दोन कैद्यांचा अकस्मात मृत्यू झाला. 59 वर्षीय बाबुराव पंच अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची (Life Imprisonment) शिक्षा भोगत होता. तर 39 वर्षीय नरेंद्र राजेश वाहने एक कोटी 64 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात (Cheating) आरोपी होता. दोन्ही कैद्यांच्या मृत्यू प्रकरणी धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र एका मागून एक दोघा कैद्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोण होते कैदी? बाबुराव पंच याने नागपूरच्या कोतवाली परिसरातील एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. या…
नवी दिल्ली, 14 मार्च : टेक्नोलॉजी कंपनी गुगलने (Google) एक नवं फीचर सुरू केलं आहे. कंपनीने आपल्या युजर्ससाठी फायदेशीर व्हॉइस पार्किंग फीचर (Voice Parking Feature) आणलं आहे. या नव्या फीचरद्वारे युजरला आपल्या आवाजाचा वापर करुन पार्किंग पेमेंट (Parking Payment) करण्याची सुविधा मिळेल. युजर्सला पार्कमोबाइलसह पार्टनरशिपद्वारे पार्किंग पेमेंटची सुविधा दिली जाईल. ही पार्टनरशिप ट्रान्सपोर्ट सेगमेंटमधील असून गुगल मॅप्समध्ये (Google Maps) बाइकिंग आणि राइड हेलिंग सामिल करणं आहे. डिजिटल की डेव्हलप करणं आणि वाहनात आपल्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमला इंटिग्रेट करण्यासाठी व्हीकल मेकर्ससह काम करणं या गोष्टी सामिल आहेत. युजर्सला पार्कमोबाइलसह पार्टनरशिपची पोहोच सध्या मर्यादित आहे. पार्किंग गुगलला त्याच्या ग्राहकांच्या दैनंदिन जीवनात आणखी…
रत्नागिरी | प्रतिनिधी चिपळूण तालुक्यातील शिरगाव परिसरातील तीन मित्र शिकारीसाठी दुचाकीवरून ट्रिपल सीट गाडीवरून जात असताना हातातील बंदूक खाली पडून फायर झाले व त्यातून सुटलेल्या छऱ्याने शिरगाव येथील तुषार विश्वास साळुखे या युवकाचा बळी गेला तर अन्य दोघे गंभीररीत्या जखमी झाले.यातील एकाला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. हा प्रकार तळसर बोधवाडी ब्रिजजवळ रविवारी रात्री २ च्या सुमारास घडला. याबाबत शिरगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद आहे. शिरगाव परिसरातील तुषार विश्वास साळुखे (२०),शुभम दिनकर नलावडे (२०) व तळसर येथील निखिल बळवंत राजेशिर्के (२२) हे तिघेजण क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी जातो,असे सांगून घरातून निघून गेले. त्यानंतर एका दुचाकीवर हातात बंदूक…
भंडारा शहरात स्मशान भूमित झाला शासकीय इतमामात अंतसंस्कार… पोस्टिंग झालेल्या ठिकाण आर्मी वाहनातुन झाला होता अपघात.. अखेर अपघाती निधन झालेला 21 महार रेजिमेंटचा आर्मी जवान चंद्रशेखर उर्फ संदीप भोंडे ह्याचे 72 तासानन्तर भंडारा शहराच्या मुंख्य स्मशान भूमित शासकीय इतमामात अंतसंस्कार करण्यात आले असून ह्यावेळी भंडारा जिल्हाधिकारी सह आर्मीचे आलाकमान उपस्थित होते। भंडारा जिल्ह्यातील सुपुत्र असलेल्या संदीप उर्फ्र चंद्रशेखर भोंडे हा भारतीय सैन्य दलात जम्मू काश्मीर येथे कार्यरत होता।संदीप हा कर्तव्यर असतांना जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील मच्छीगण वरुन कोरोणा विलगीकरण केंद्र कडे जात असतांना सरकुली येथे अनियंत्रित गाडीचे अपघात झाले।यात संदीप सहित पाच जवान गंभीर जखमी झाला होता यात उपचारादरम्यान भंडारा…
टारगट मुले रडारवर अनेक प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा सरवर शेख भंडारा : शाळा महाविद्यालय वा तत्सम सार्वजनिक ठिकाणी महिलांना टारगटांचा त्रास होऊ लागला आहे. या टारगटांना त्यांची जागा दाखवण्यासाठी भंडारा येथील दामिनी पथकाने कंबर कसली आहे. किंबहुना दामिनी पथकाची धडकी अनेकांनी घेतली आहे. असे अभिनंदनीय काम भंडाराच्या दामिनी पथकाने केले आहे. प्रत्येक युवती स्वरक्षणासाठी स्वयंपूर्ण व्हावे यासाठी हे दामिनी पथक अविरत कार्यरत आहे. युवतीच नव्हे तर अन्यायग्रस्त महिलांनाही या • पथकाने दिलासा दिला आहे. महाविद्यालयीन परिसरात राहणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त ● लावण्यासाठी या दामिनी पथकावर जबाबदारी आहे. भंडारा जिल्ह्यात एकमेव असलेल्या या दामिनी पथकावर जिल्ह्याभरात होणाऱ्या अन्यायाला वेळीच पायबंद करण्याची जबाबदारी सोपविण्यात…
मोठ्या घातपाताच्या उद्देशाने चारचाकी वाहनाने तलवार घेऊन फिरणाऱ्या दोन आरोपीना शहर पोलिसांनी केली अटक… भंडारा न्यूज : मोठ्या घातपाताच्या उद्देशाने चारचाकी वाहनातुन तलवारी घेऊन फिरणाऱ्या दोन आऱोपीना भंडारा शहर पोलिसांनी मध्यरात्री नाकाबंदी दरम्यान अटक केली आहे।अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव सत्यजित मनोहर गजभिये व मनोज हिराचंद मेश्राम सांगितले जात असून दोघे रामटेक निवासी सांगितल्या जात आहे।भंडारा पोलिसांनी चारचाकी वाहनासह दोन तलवारी जप्त केल्या असून वेळीच पोलिसांच्या समय सूचकते मुळे आरोपी वेळीच सापडल्याने मोठा अनर्थ टाळला आहे। जिल्ह्यात सद्धा भंडारा पोलिसांकडून आल आउट मिशन सुरु असून शुक्रवारी मध्यरात्री दरम्यान भंडारा शहरातील शास्त्री चौकात पोलिसांनी नाकाबंदी केली होती।वरठी कडून वेगवान चारचाकी (क्रमांक…
प्रतिनिधी भंडारा, 5 मार्च : राज्यात महिला आणि मुली कितपत सुरक्षित आहेत? असा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. प्रत्येक दिवशी महिला अत्याचाराच्या घटना समोर येताना दिसतात.महिला अत्याचाराच्या घटनांना आळा बसावा यासाठी राज्य सरकारकडूनही बरेच प्रयत्न सुरु आहेत. मात्र, तरीही या घटना कमी होताना दिसत नाही. भंडाऱ्यात तर एका नराधमाने सर्वच सीमा पार केल्या. त्याने अवघ्या पाच वर्षाच्या मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने मुलगी आरोपीच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी ठरली. अन्यथा फार मोठा अनर्थ घडला असता. या प्रकरणी पीडितेच्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपीला अवघ्या बारा तासात बेड्याही ठोकल्या आहेत. आरोपी समीर देवदास खोब्रागडे नेमकं…
यवतमाळ :- यवतमाळ शहरातील लोहारा एमआयडीसी पॉवर हाऊस परिसरात प्रेमप्रकरणातून एका १८ वर्षीय तरुणीची दगडाने ठेचून हत्या करून प्रियकराने स्वत:च्या हाताची नस, गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला.शुभम बाकल (२३) असे जखमी प्रियकराचे नाव आहे. दरम्यान एमआयडीसी पॉवर हाऊस परिसरात नागरिकांना एक तरुण गंभीर अवस्थेत आढळून आला. या वेळी नागरिकांनी धाव घेऊन त्याची विचारपूस केली असता, त्याने एका तरुणीची हत्या केल्याचे सांगितले. दरम्यान तेथीलनागरिकांनी याबाबत लोहारा पोलिसांना कळवले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पथकाने घटनस्थळी दाखल होत जखमी तरुणाला शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तरुणीची शोधमोहीम राबवली. या वेळी त्या तरुणाने चक्क दगडाने ठेचून तरुणीची हत्या केल्याचे समोर आले. प्रेमप्रकरणातून शुभम…
मुंबई | “एसटी कर्मचारी १० तारखेपर्यंत कामावर कामावर रुजू झाले नाही. तर एसटी कर्मचाऱ्यांना नोकरीची गरज नाही, असे आम्ही समजू… मग त्याबाबती कायदेशीर ज्या काही प्रक्रिया राबवायच्या आहेत. त्या आम्ही राबवू,” असा धमकी वजा इशारा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हणाले. या अहवालात आर्थिक, कायदेशीर आणि प्रशासकीय संदर्भात विलीनीकरण शक्य नाही. हा अहवाल आज आलेला आहे. म्हणून मी आज कामगारांना पुन्हा एकदा आवाहन करतो की, आपण कामावर यावे, ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झालेली आहे, ज्यांचे निलंबन झालेले आहे. त्यांचे निलंबन आम्ही मागे घेतले आहे,असेही आवाहन परबांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे.…
नागपूर : परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अपार्टमेंटमध्ये छापा घातला.पोलिसांनी येथे तीन हवाला व्यावसायिकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ४ कोटी २० लाखांची रोकड जप्त केली. या कारवाईमुळे शहरातील हवाला व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. गोंदियातील हवाला व्यावसायिक कोट्यवधींची रोकड घेऊन नागपुरात येणार असल्याची माहिती उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांना मिळाली. त्यावरून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सूचित करून कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुंभारपुऱ्यात इंद्रायणी साडीच्या मागे एक अपार्टमेंट आहे. तेथे शुक्रवारी रात्री पोलिसांनी छापा घातला. तेथे नेहाल सुरेश वडालिया (वय ३८, रा. कोतवाली), वर्धमान विलासभाई पच्चीकार (वय ४५) आणि शिवकुमार हरीशचंद दिवानीवाल (वय…
नागपूर : दहावीची तोंडी परीक्षा देऊन परत येताना विद्यार्थ्यावर काळाने घाला घातला. भरधाव वाहनाने विद्यार्थ्यांच्या दुचाकीला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघात विद्यार्थी जागीच ठार झाला आहे.दिशांत महादेव पटेल असे मयत विद्यार्थ्याचे नाव असून ही घटना कामठी-नागपूर मार्गावर मोहंमद अली पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मयंक कुमार सिंग आणि आरव चौधरी हे विद्यार्थी अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झालेले सर्व विद्यार्थी जीपीएस आर्मी पब्लिक स्कूलचे आहेत. नेमकं काय घडलं? नागपुरात दहावीच्या तिघा विद्यार्थ्यांचा रस्त्यात अपघात झाल्याचं उघडकीस आलं आहे. कामठी-नागपूर मार्गावर मोहंमद अली पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली. दहावीची तोंडी परीक्षा देऊन…
मुंबई : राज्यातील सर्व कनिष्ठ न्यायालयात प्रलंबित असलेल्या आणि हायकोर्टानं स्थगिती दिलेल्या खटल्यांची तपशीलवार माहिती द्या,असे मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश दिले आहेत. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आजी-माजी सर्व खासदार व आमदारांच्या विरोधातील प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांच्या प्रश्नावर हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत.मुंबई उच्च न्यायालयानं स्युमोटो याचिका दाखल केली आहे. सोमवारपर्यंत माहिती सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. राज्यातील चार विभागातील कनिष्ठ न्यायालयात लोकप्रतिनिधींविरोधात 51 खटले प्रलंबित आहेत.त्यात प्रमुख्याने मुंबई 19,नागपूर 9, औरंगाबाद 21, गोवा 2 आदींचा समोवश आहे. राज्यातील जिल्हा पातळीवर कनिष्ठ न्यायालयातील प्रलंबित खटले मुंबई 201,नागपुर 126 औरंगाबाद 157 गोवा 20 जिल्हानिहाय सर्वाधिक खटले अमरावती 45 परभणी 40…