भंडारा : बारावीचा निकाल घोषित झाला आणि अपेक्षित गुण मिळाले नाही. त्यामुळे अपेक्षाभंग झालेल्या बारावीच्या विद्यार्थिनीने तांदळाला लावायचे औषध (पावडर) खाल्ले. शरीरात विषाचे प्रमाण जास्त झाल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना लाखनी येथे आज बुधवारी दुपारी घडली.
मयुरी किशोर वंजारी रा. लाखनी असे विद्यार्थिनीचे नाव आहे. मयुरी ही लाखनी येथील समर्थ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. दुपारी बारावीचा निकाल घोषित झाला. मयुरीचे आई वडील मजुरी करतात. आई वडिलांचा भविष्यात आधार बनता यावे, हा दृष्टीकोन मयुरीने ठेवला होता.
मयुरीने शिकवणी विना घरीच अभ्यास करून परीक्षा दिली. तिला निकालाची उत्सुकता लागली होती. दुपारी निकाल घोषित झाला आणि तिला केवळ ५५ टक्केच गुण मिळाले. निकाल बघून घरी आल्यावर तिने घरातील तांदळाला अळी लागू नये म्हणून लावायचे औषध (पावडर) खाल्ले.
ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी मयुरीला तातडीने लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती अत्यवस्थ असल्याने पुढील उपचारासाठी तिला भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. उपचारादरम्यान तिचा भंडारा येथे मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच लाखनीचे पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे, पोलिस उपनिरीक्षक अमोल तांबे हे घटनास्थळी पोहचले.
Trending
- Bhandara:लाखनी पोलिसांना दुर्लक्षतेचे प्रकरण भोवले
- Bhandara Crime : सुडभावनेतून भंडाऱ्यात बहिणीच्या दिराची निर्घृण हत्या
- Bhandara leopard attack: जखमी बिबट्यावर उपचारासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यावर बिबट्याचा हल्ला
- OBC Reservation BREAKING: ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालं
- खासदार,आमदार साहेब तसेच माजी नगरसेवकांनो भंडारा शहराच्या खड्ड्याकडे लक्ष द्या ; संजय मते
- Bhandara Flood: चौफेर पूर, त्यात प्रकृती खालावली! ऍम्बुलन्स कुठून नेणार? अखेर बोट मदतीला धावली
- सुप्रीम कोर्टाच्या दिलासामुळे राज्यात केवळ ‘ईडी’ सरकार-हेमंत पाटील
- लाडकी: ड्रॅगन गर्ल मूव्ही रिव्ह्यू: आरजीव्हीचा चित्रपट अॅक्शनने भरलेला आहे